सामाजिक दायीतवाची पूर्ती

ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांकडून रुग्णालयांना मदत

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः कोरोनाच्या वाढच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना मदत करण्यासाठी अनेक दाते मदत घेऊन पुढे येत आहेत. समाजाचं आपण देणं लागतो याची जाणीव असलेले ज्वेलर्स जगन्नाथ गंगाराम पेडणेकर यांनी आपत्तीच्या काळात सामाजिक दायित्व निभावलं आहे. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे कोरोना काळात मदतीचा ओघ सुरूच आहे.

हेही वाचाः मासळी खरेदीसाठी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन आणि पीपीई किटचा पुरवठा

जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सतर्फे रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी आणि मडगाव शासकीय जिल्हा रुग्णालयांना मोफत ऑक्सिजन आणि पीपीई किटचा पुरवठा करण्यात आला. गेली अनेक वर्ष जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स व्यावसायिकते सोबतच सामाजिक जाणिवेतून व त्याप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अखंड समाजकार्य करीत आहे.

हेही वाचाः गोव्यातील पहिली ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ केपेत कार्यान्वित

सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीचा पुरवठा

समाजश्रेष्ठी स्व. जगन्नाथ (भाई) गंगाराम पेडणेकर यांनी नेमून दिलेल्या तत्वांवर आजही जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आपली वाटचाल आणि समाजकार्य पार पाडीत आहेत. करोना संकट काळात सध्या कोरोना रुग्णांना प्राणवायूची नितांत आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न करता आपला खारीचा वाटा म्हणून जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे संचालक आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी ऑक्सिजन आणि पिपीई किटचा पुरवठा केला. रविवारी रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी आणि मडगाव या ठिकाणी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या व्यवस्थापकांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे मदतीचा पुरवठा केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!