जीत आरोलकांच्या मगो प्रवेशात प्रशासनाचं विघ्न, पोलिसांसोबत बाचाबाची, नंतर रस्त्यावरच पक्षप्रवेश

नाट्यमय घडामोडींनंतर अखेर मगो पक्षात जीत आरोलकरांचा प्रवेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

मांद्रे : मांद्रेचे युवा नेते जीत आरोलकर मगोमध्ये प्रवेश करणार असं ठरलेलं. पण पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यानं एकच गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. अखेर मांद्रेचे युवा नेते जीत आरोलकरांनी रस्त्यावरच मगो पक्षात अधिकृत प्रवेश केला. प्रशासनाच्या निर्णयाचा फटका आरोलकरांच्या प्रवेशावर झाल्यानं कमालीची नाराजी मगो कार्यकर्त्यांमध्ये पसरली होती.

नेमकं काय झालं?

जीत आरोलकर हे पाडव्याच्या मुहूर्तावर मगो पक्षात प्रवेश करणार होते. मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात प्रशासनानं नकार दिला होता. तरीही कार्यकर्ते हा कार्यक्रम करण्यावर ठाम होते. अखेरीस पोलिसांनी हस्तक्षेत करत हा कार्यक्रम उधळून लावला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांना पोलिसांसोबत बाचाबाचीदेखील केली.

अखेर जीत आरोलकरांचा पक्षप्रवेश गुंडाळावा लागतो की काय असाा प्रश्न विचारला जात होता. यावेळी पेडण्याचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी दे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही हा कार्यक्रम करु नये, असं आवाहन घटनास्थळी असलेल्या कार्यकर्त्यांना केलं. मगोचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या समक्ष हा सगळा प्रकार घडला. हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आल्यानं कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले होते. अखेर जीत आरोलकरांनी मागे न हटता रस्त्यावरच अधिकृतरीत्या मगोमध्ये प्रवेश केलाय.

कोण आहेत जीत आरोलकर?

जीत आरोलकर हे उद्योजक आहेत. मांद्रेमधील युवा नेते म्हणून ते ओळखले जातात. मागच्या वेळी त्यांनी पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ते उभे राहिले होते. विजयी झाले नसले तरी त्यांनी बऱ्यापैकी मतं मिळवली होती. आता ते मगोमध्ये प्रवेश करणार असल्यानं राजकीय वातावरण तापलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!