श्री शांतादुर्गा कुंकळ्येकरीण देवीच्या जत्रोत्सवाला थाटात प्रारंभ

गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात असंख्य भाविक

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

मडगाव : फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्येकरीण देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला सोमवारपासून थाटात प्रारंभ झाला. देवस्थान समितीचे अध्यक्ष नितीन देसाई यांनी जत्रोत्सवासंबंधी सविस्तर माहिती दिली.

सोमवार दि. १८ रोजी सकाळी श्रीस महाभिषेक झाला. रात्री विधीपूर्वक नमन, शिबिकोत्सव, पालखी, जागर, आरती, प्रसाद होईल.

दिवस दुसरा

पौष शुद्ध षष्ठी मंगळवार दि. १९ रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, रात्री श्रींची अंबारी रथातून मिरवणूक, आरती, प्रसाद होईल.

दिवस तिसरा

पौष शुद्ध सप्तमी बुधवार दि. २० रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, रात्री जागर, शिबिकोत्सव, श्रींची फुलांच्या रथातून मिरवणूक, आरती, प्रसाद वैगेरे होईल.

दिवस चौथा

पौष शुद्ध अष्टमी गुरुवार दि. २१ रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, रात्री श्रींची विजय रथातून मिरवणूक, आरती, प्रसाद वैगेरे होईल.

दिवस पाचवा

पौष शुद्ध नवमी शुक्रवार दि. २२ रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, रात्री जागर, शिबिकोत्सव, पहाटे ६ वाजता श्रींची महारथातून भव्य मिरवणूक, आरती, प्रसाद वैगेरे होईल.

दिवस सहावा

पौष शुद्ध दशमी शनिवार दि. २३ रोजी सकाळी श्रीस महाभिषेक, रात्री आरती, प्रसाद वैगेरे होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!