श्री मारूतीराय संस्थानाचा जत्रौत्सव

जत्रौत्सवानिमित्त श्री मारूतीरायांची पालखीतून भव्य मिरवणूक

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः मळ्यातील मारुतीगडावरील श्री मारुतीराय संस्थानचा ‘९०’वा जत्रौत्सव २२ फेब्रुवारी (माघ शु. दशमी) पासून सुरू होणार आहे. हा जत्रौत्सव २५ फेब्रुवारी (माघ शु. त्रयोदशी) पर्यंत चालणार आहे. जत्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

जत्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

सोमवार २२ फेब्रुवारीला श्री मारूतीराय संस्थानाच्या जत्रौत्सवाला सुरुवात होणारेय. यानिमित्त सकाळी ‘श्रीं”स अभिषेक होईल. पहाटे ५ वा. मुख्य धार्मिक विधी होतील. सकाळी ९.३० वा. सुरुवातीला पुण्यहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, सग्रहमुख हनुमान मुलमंत्र जप होईल. त्यानंतर १२.३० वा पूर्णाहुती, आशीर्वाद नंतर महाआरत्या व तीर्थप्रसाद होईल.

श्री मारूतीरायाची भव्य मिरवणूक

जत्रौत्सवानिमित्त श्री. मारुतीरायाची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात येणारेय. संध्याकाळी ७ वा. या मिरवणूकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक श्री पांडुरंगाच्या देवालयातून निघून मानसभाटपर्यंत जाणार आहे आणि परत श्री मारुतीरायांच्या देवालयात येणार आहे. त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होणारेय. मंगळवार २३ ते २५ फेब्रुवारीपर्यंत रात्री १०.३० वा श्रींची देवालय परिसरात पालखीतून मिरवणूक, आरती, प्रसाद व पावणी होणार आहे.

जत्रौत्सवानिमित्त नाटकांचे आयोजन

श्री मारूतीराय संस्थानाच्या ९० व्या जत्रौत्सवानिमित्त नाट्यप्रयोगांचं आयोजन करण्यात आलंय. २३ फेब्रुवारीला तिसवाडीतील सीतामाई दैवज्ञ महिला मंडळाचे ‘खतखते’ हे कोकणी विनोदी नाटक होणार आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन आशिष अशोक नागवेकर यांनी केलंय. २४ फेब्रुवारीला करमळीतील सुयोग कलामंच, करमळी प्रस्तुत ‘आता करपाचे किते?’ हे विनोदी आणि रहस्यमय नाटक होणार आहे. या नाटकाचं लेखन महेश चंद्रकांत नायक आणि दिग्दर्शन शेखर उजगांवकर यांनी केलंय. २५ फेब्रुवारी अभिनव – पणजी यांचं ‘आवयचो पूत सुनेचेर भूत’ हा नाट्यप्रयोग होणारेय. या नाटकाचं लेखन महेश चंद्रकांत नायक आणि दिग्दर्शन उमेश नायक यांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!