जे पी नड्डा गोव्यात दाखल

मुख्यमंत्री स्वत: स्वागतासाठी हजर; भाजप कार्यकर्त्यांनी केली विमानतळावर गर्दी

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजीः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गोव्यात दाखल झालेत. दुपारी 2 वा. त्यांचं दाबोळी येथील विमानतळावर आगमन झालंय. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते. कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील नड्डा यांच्या स्वागतासाठी विमनतळावर हजेरी लावली. यावेळी मु्ख्यमंत्री सावंतांनी माध्यमांशी संवाद साधला.

२०२२ मध्ये पूर्ण ताकदीनं विधानसभेत भाजपला यश मिळेल

जे.पी. नड्डा यांचं दाबोळी विमानतळावर स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतः जातीने हजर राहिले. यावेळी माध्यमांशी संवाद मुख्यमंत्री म्हणाले, मी गोंयकारांच्या वतीने जे.पी. नड्डा यांचं गोव्यात स्वागत करतो. दोन दिवसांच्या या दौऱ्यात त्यांचा व्यस्त कार्यक्रम तयार आहे. त्यांच्या गोव्यात येण्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांची उमेद वाढलीये. त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी आम्ही सुरू केलीये. आज जे.पी. नड्डा यांच्या स्वागताखातर कार्यकर्त्यांनी दाबोळी विमानतळावर केलेली गर्दी हे सांगते की भाजपवर लोकांचं किती प्रेम आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचं सरकार बहुमताने येणार यात शंका नाही.

जे.पी. नड्डा यांच्या कार्यक्रमाची रुपरेषा

रविवारी सकाळी  8.30 वा नड्डा मंगेशी येथे देव मंगेशाचं दर्शन घेऊन दिवसभरातील कार्यक्रमांची सुरुवात करणार आहेत.  त्यानंतर 9.15 वा. तपोभूमी कुंडई येथे सद्गुरु ब्रम्हेशानंदाचार्य स्वामींसोबत ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. पुढे 10.30 वा. पणजीतील डॉन बॉस्को हायस्कूल लसीकरण केंद्राला ते भेट देतील. त्यानंतर दुपारी 3.15 वा. पणजीतील ताज विवांता येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी संवाद साधतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!