भाजप सरकारने लादलेल्या आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणीबाणीतून गोव्याची मुक्तता करण्याची वेळ आली

दिगंबर कामतः भाजपच्या असंवेदनशील वृत्तीमुळे गोव्यात सरकार कोलमडलं

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः भाजप सरकारच्या दंडेलशाही आणि असंवेदनशील वृत्तीमुळे गोव्यात आज सरकारी प्रशासन पूर्णपणे कोलमडलं आहे. बेजबाबदार भाजप सरकारने लादलेल्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक आणीबाणीतून गोव्याची मुक्तता करण्याची आता वेळ आली आहे, असं विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटलंय.

हेही वाचाः लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उमेदवारीची स्वप्ने पाहू नयेत!

भाजपला आणीबाणीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

भाजपला देशात अनेक वर्षांमागे लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजप सरकारने राज्यात अनधिकृतपणे लादलेल्या आणीबाणीने गोंयकारांना हाल, कष्ट आणि त्रास सहन करावे लागत आहेत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यावेळी लावलेल्या आणीबाणीबद्दल २४ जानेवारी १९७८ रोजी देशाची माफी मागितली होती आणि जनतेने त्यांना परत सत्तेत आणलं होतं याची आठवण दिगंबर कामतांनी करून दिली.

हेही वाचाः सुकूरपाठोपाठ साल्वादोर द मुंद पंचायतीत सत्तांतर

भाजपच्या हलगर्जीपणामुळे लोकांचे प्राण गेले

देशात त्याकाळी लावलेल्या आणीबाणीचा विषय उगाळण्याचा प्रयत्न करुन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये. आज बेजबाबदार, असंवेदनशील आणि नाकाम भाजप सरकारने राज्यात अघोषीत आणिबाणी लावली असून, सरकारच्या प्रत्येक कृतीतून लोकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप सरकारच्या नाकर्तेपणाने आज राज्यात ‘आरोग्य आणीबाणी’ असून, सुमारे ७४ निष्पाप रुग्णांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आपले प्राण गमवावे लागले. सरकारने गोव्याचा ‘प्रयोग शाळा’ म्हणून वापर करताना लोकांचा ‘गिनी पिग’ म्हणून वापर करण्याचा प्रयत्न केला. आता कोविडची तिसरी लाट आली तर त्याचा सामना करण्यासाठी सरकारकडे कसलाच कृती आराखडा तयार नाही. आज सरकारी हलगर्जीपणानेच ३०२२ लोकांचे कोविडने प्राण गेले, अशी टीका कामतांनी केली आहे.

हेही वाचाः VIDEO | पादचाऱ्याचा निष्काळजीपणा नडला; भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने उडवलं

जमा-खर्चाचा हिशेब कोलमडल्याने लोक प्रचंड तणावाखाली

बेजबाबदार सरकारच्या नाकर्तेपणाने आणि ढिसाळ कारभाराने आज राज्यात ‘आर्थिक आणीबाणी’ असून, राज्य आता दिवाळखोरीत गेलं आहे. सरकारकडे खाण व्यवसाय सुरू करण्याची कोणतीच ठोस योजना नसून, दिशाहीन सरकारने पर्यटन व्यवसायाची वाट लावली आहे. सामान्य आणि कष्टकरी व्यावसायीक आर्थिक बोजाखाली चिरडला आहे. सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी, पॅकेज देण्यासाठी तयार नाही हे धक्कादायक आहे. आज प्रत्येक घरातील जमा-खर्चाचा हिशेब कोलमडल्याने लोक प्रचंड तणावाखाली आहेत, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः आंध्रप्रदेशात जाणारं 16 लाखांचं गोव्याचं मद्य कर्नाटकात पकडलं !

सरकार विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांची सरकार करतंय गळचेपी

राज्यात भाजप सरकारने ‘सामाजिक आणीबाणी लावली असून, लोकांच्या भावनांची कदर न करता, पर्यावरण आणि वन्यजीवांना धक्का देणारे तीन प्रकल्प सरकार लादण्याचा प्रयत्न करत आहे. रेल्वे दुपदरीकरण, महामार्गाचं रुंदीकरण आणि वीज वाहिनी टाकण्याचं काम लाखो झाडांची कत्तल करुन लादण्याचे प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा आरोप कामतांनी केला. असंवेदनशील भाजप सरकारने दक्षिण गोव्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावून, भय निर्माण करून किनारी व्यवस्थापन आराखडा जनसुनावणीत सहभागी होण्यापासून लोकांना परावृत करण्याचा प्रयत्न चालवला आहे. सरकार विरुद्ध आवाज उठविणाऱ्यांची गळचेपी करण्याचं कृत्य सरकार करत आहे, असंही कामत म्हणालेत.

हेही वाचाः VIDEO VIRAL | कमालच केली या पोराने!

भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी लोकांनी पुढे येणं गरजेचं

शेळ-मेळावली आयआयटी विरोधी आंदोलनातील सर्वांवरील खटले ताबडतोब सरकारने मागे घ्यावेत, राजकारण्यांच्या गैरकारभारावर उजेड टाकणारी गाणी तयार करणाऱ्या कलाकारांना अटक करणं बंद करावं तसंच आपल्या न्याय मागण्यासाठी पुढे येणाऱ्या विद्यार्थ्यांना अटक करणं थांबवावं, अशी मागणी कामतांनी केलीये. लोकांनी बेजबाबदार भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आता पुढे येणं गरजेचं असुन, गोव्याची अस्मिता, पर्यावरण आणि वन्यजीवन सांभाळण्यासाठी लढा देणं काळाची गरज आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!