कृषी कार्ड करण्यासाठी जमिनीचा दाखला असणे अनिवार्य नाही

उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः कृषी खात्याच्या कुठल्याही योजनांसाठी पात्र होण्यास कृषी कार्ड अनिवार्य असतं. कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकाऱ्याच्या नावावर जमीन असणं अनिवार्य असतं असा सर्व सामन्यांचा समज आहे. जरी शेतकऱ्याच्या नावावर जमीन नसली, तरी सुद्धा आता कृषी कार्ड बनवणं शेतकऱ्यांना शक्य असणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी सांगितलं.

केपे नगरपालिकेच्या सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन

केपे मतदार संघातील यांत्रिक पद्धतीने शेत कापणी करण्यासाठी शेतकऱ्यांना धनादेश वाटप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर बोलत होते. हा कार्यक्रम केपे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित केला होता. यावेळी एकूण १९८ शेतकऱ्यांना हे धनादेश वाटण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत केपेच्या नगराध्यक्ष सूचिता शिरवईकर, जांबावलीच्या सरपंच जासिंता डायस, उपनगराध्यक्ष विलियम फर्नांडिस, प्रसाद फळदेसाई, चेतन हलदणकर, दयेश नाईक, दिपली नाईक, गणपत मोडक, माजी नगरसेवक पाउलो फर्नांडिस आणि लुईजा कारवालो, क्षेत्रीय कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हिताचे बरेच उपक्रम हाती घेतलेत

कृषी खात्याच्या कसल्याही योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास कृषी कार्ड अनिवार्य असतं आणि आत्तापर्यंत कृषी कार्ड बनविण्यासाठी शेतकऱ्यांचं नाव १ आणि १४ च्या उताऱ्यामध्ये असणं गरजेचं होतं. कृषी मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हिताचे बरेच उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, असं उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर पुढे म्हणाले. ते पुढे म्हणाले, की राज्यात शेतीला प्राधान्य देण्यासाठी कम्युनिटी फरमिंग एट सोर्स करण्यात आलं आहे.

राज्यात पहिल्यांदाच सर्व प्रकारच्या शेत कापणीसाठी मिळणार अनुदान

केपे, काणकोण, सांगे तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनी डोंगराळ भागात असल्यामुळे यंत्राच्या मदतीने कापणी करणं शक्य होत नाही. त्यांना मजुरांचा वापर करूनच कापणी करावी लागते. सध्या यांत्रिक पद्धतीने शेताची कापणी करणाऱ्यांनाच ५० टक्के कापणीचं अनुदान प्राप्त होत असतं. याचा फायदा १२ हजार अतिरिक्त भात पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः Politics | Cabinet meeting | कॅबिनेट बैठकीत कोणते निर्णय झाले?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!