हवामानातील समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं गरजेचं: श्याम साखळकर

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः जैविक संपत्तीची होणारी मोठ्या प्रमाणात हानी, त्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. या हवामानाचा समतोल राखायचा असेल, तर प्रत्येकाने झाडं लावून पर्यावरण रक्षणात आपल्यापरीने योगदान देणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा येणाऱ्या काळात आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं प्रतिपादन ‘वाळपई रेडक्रॉस सोसायटी’च्या श्याम साखळकरांनी केलं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘वाळपई रेडक्रॉस सोसायटी’तर्फे झाडं वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. होंडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक महिलांना झाडं देण्यात आली.
हेही वाचाः होंडा औद्योगिक वसाहतीमधील खराब गटार अवस्थेचा वाहनचालकांना त्रास
आजोबा महिला मंडळाची उपस्थिती
यावेळी आजोबानगर महिला मंडळाच्या गीता कोरगावकर, रेश्मा गावडे, रतन देसाई, नंदा देसाई, मोनिका चारी, स्मिता देसाई, शांती दुलबाजी यांना झाडे देण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी या संस्थेच्या चांगल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट सुरुच
निसर्ग रक्षणाचा मंत्र जपुया
गेल्या काही वर्षांपासून हवामानामध्ये सातत्याने बदल घडून येत आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे माणसावकडून होणारी पर्यावरणाची ऱ्हार. अशावेळी प्रत्येकाने निदान एक तरी झाड जरूर लावावं. जेणेकरून आपल्यापरीने निसर्ग रक्षणाचा मंत्र जपण्याची मोठी प्रक्रिया पूर्ण होईल, असं आवाहन साखळकरांनी केलं. रेड क्रॉस सोसायटीतर्फे मोठ्या प्रमाणात झाडांचं वितरण करण्यात येणार आहे. यामुळे निसर्गाप्रती ही संस्था आपली बांधिलकी यापुढेही जपणार आहे. तसंच अशा क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांना या संस्थेकडून प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
हेही वाचाः कोरोना लाटेत कामापेक्षा श्रेय लाटण्यावर केंद्राचा ‘डोळा’!
संस्थेतर्फे विविध सामाजिक उपक्रम
होंडा भागात वाळपई रेडक्रॉस सोसायटीतर्फे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामुळे समाजात एक वेगळेपण निर्माण होतं. अशाच प्रकारचं कार्य इतर संस्थांनी करणं अत्यंत गरजेचं आहे, असं आजोबा महिला मंडळाच्या अध्यक्ष गीता कोरगावकर म्हणाल्या.