कोविड मृतांना सन्मान देणं प्रत्येकाचं कर्तव्य

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड महामारीच्या संकटाने आज संपूर्ण जगात हाहाकार माजवलाय. शेकडो लोकांचे प्राण जात आहेत. कोविडच्या संसर्गाने मृत झालेल्यांना सन्मान देणं आणि त्यांच्यावर योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास कोणीच आडकाठी आणु नये अशी कळकळीची विनंती गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

हेही वाचाः कोविड विरोधात भारताला जागतिक समुदायाकडून मदतीचा हात

गोंयकारांनी अपप्रचाराला बळी पडू नये

रविवारी बस्तोडा येथे घडलेला प्रकार गोव्यात परत घडू नये यासाठी सरकारने त्वरित पावलं उचलावित अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे. गोंयकारांनी कसल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या गावच्या कोविड बाधीत मृतांवर अंतिम संस्कार करण्यास मदत करावी, असं आवाहन पणजीकरांनी केलं आहे.

हेही वाचाः तुम्ही होम आयझोलेशनमध्ये आहात? तर हे नक्की वाचा…

कोविड बाधित मृत व्यक्तीपासून कोविड संसर्ग होतो हा भ्रम

कोविडची बाधा होऊन मृत पावलेल्या व्यक्तीपासून कोविडचा संसर्ग होतो हा केवळ भ्रम आहे. प्रत्येकाने मास्क वापरुन तसंच योग्य काळजी घेऊन काम केल्यास कोविडवर नियंत्रण मिळवणं सोपं होणार आहे. आज जात-पात-धर्म बाजूला ठेवून प्रत्येकाने शक्य होईल त्याप्रमाणे मदतीसाठी पुढे येणं गरजेचं आहे.

हेही वाचाः खासगी रुग्णालयात कोरोना लसींच्या दरात 6 पटीने वाढ

तर मृतदेह हाताळण्याचं उभं होणार संकट

आज कोविड इस्पितळात काम करणारे डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी, रुग्णवाहिका चालविणारे चालक व कर्मचारी, शववाहिका चालक तसंच वाहक यांनी वेगळी भूमिका घेतल्यास रुग्णांवर उपचार करणं कठीण होणार आहे. तसंच मृतदेह हाताळण्याचं एक संकट उभं राहणार आहे, असं पणजीकर म्हणाले.

हेही वाचाः कोरोना मृतदेहाच्या कपड्यांवर ब्रँडेड लोगोचा ‘गोरखधंदा’

योग्य उपाययोजनेची आवश्यकता

गोव्यातील प्रत्येक पंचायत तसंच नगरपालिका मंडळांनी स्मशानभूमी व्यवस्थापन मंडळ तसंच दफनभूमी व्यवस्थापन मंडळांना विश्वासात घेऊन कोविड मृतांवर अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!