सरकार गोंयकारांना खासगी रुग्णालयात जास्ती खर्चात लसीकरणासाठी भाग पाडतंय?

‘आप’चा राज्य सरकारला प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविडशी लढण्यासाठी लस ही संजीवनी असून गोव्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण होणार आहे. गोवा सरकारला लसीकरणासाठी आता जास्त खर्च करावा लागत आहे, याबद्दल आम आदमी पक्षाने (आप) गोवा सरकारला प्रश्न केला आहे.

हेही वाचाः वॉर अगेंन्स्ट कोविड-19 ; कोविड कृती दल हवं

खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडलं जातंय

राज्य संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 23 एप्रिल रोजी होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या ठीक एक दिवस आधी गोयंकरांना मोफत लस देण्याची मोठी घोषणा केली होती, परंतु ती घोषणा एक निवडणूक जुमलाच ठरली. सरकारने मोफत लस दिली तर नाहीच. शिवाय अद्याप लसीकरण मोहीमदेखील सुरू केलेली नाही, खासकरुन 18-45 वर्षं वयोगटातील व्यक्ती जी कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. मात्र त्यांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयात जाण्यास भाग पाडलं जात आहे.

हेही वाचाः दुर्दैवी । कर्नाटक हादरले; सरकारी रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू

लसीकरण मोहीम लवकरात लवकर पूर्ण करा

राहुल  म्हांबरे यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप आणि कोविन पोर्टलवर येणाऱ्या विविध तांत्रिक समस्यांवर प्रकाश टाकला आणि सावंत यांनी गोयंकरांसाठी ही लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी व जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी केली. आरोग्य सेवा संचालनालयाकडे ‘डीडीएसवाय’ अंतर्गत नोंदणीकृत लोकांचा डेटाबेस आहेत. आणि या आरोग्य सेवा संचालनालय आणि गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेड येथे उपलब्ध डीडीएसवाय योजनेच्या डेटाबेसच्या माहितीचा वापर करून प्रथम 35 ते 45, नंतर 25 ते 35,  आणि शेवटी 18-25 या वयोगटातील व्यक्तींना कॉल करून त्यांच्या लसीकरणाची दिनांक, वेळ आणि स्थान माहिती देण्यात यावी. जेणेकरून सुलभता यात येईल.

हेही वाचाः कोविड काळात गोव्यातील 11 कुटुंबांनी गमावले 1 पेक्षा जास्त सदस्य

दिल्लीत 18+ व्यक्तींचं लसीकरण सुरू

दिल्लीतील ‘आप’ सरकारने 3 मे पासून 18+ वयोगटापुढील व्यक्तींची लसीकरण मोहीम सुरू केली असून गर्दी रोखण्यासाठी लसीकरण होत असलेल्या नियमित रुग्णालयांव्यतिरिक्त 75 हून अधिक शाळांमध्ये नवी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती म्हांबरेंनी दिली.

हेही वाचाः नियम फक्त सामान्यांसाठीच? राजकारण्यांचं काय?

सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घ्या

मुख्यमंत्र्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व पक्षाच्या आमदारांना व राजकीय पक्षांना सोबत घेऊन लसीकरण मोहीमेबद्दल जनजागृती करावी व लोकांमध्ये लसीकरणाविषयी विश्वासाचं वातावरण तयार करण्यास सुरुवात करावी, अशी विनंती म्हांबरेंनी मुख्यमंत्र्यांना केली. मुख्यमंत्र्यांनी गोयंकरांच्या हितासाठी आपल्या खुर्चीचा वापर करत जास्तीस्त जास्त लसीच्या कुप्या खरेदी कराव्यात, असं म्हांबरे म्हणाले.

हेही वाचाः माजी आमदार विनायक नाईक यांचं निधन

सामाजिक सभागृहात लसीकरण केंद्र करा

गोव्याच्या संपूर्ण खेड्यात लसीकरण शिबिरं घेण्यात यावीत आणि लसीकरण शिबिरं हे आरोग्य केंद्र किंवा कोविड केंद्राऐवजी सामाजिक सभागृहात आयोजित केली जावीत. कारण लोकांना आरोग्य केंद्रांमध्ये जायची भीती वाटते. कारण त्याच ठिकाणी कोविड चाचण्या घेतल्या जातात.

हेही वाचाः 2020 मध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू तरुणांचे

जनतेची आर्थिक परिस्थिती बिकट

कोविड चाचणीची किंमत कमी करण्याच्या पक्षाच्या मागणीचीही पुन्हा आठवण करून देताना म्हांबरे म्हणाले की, आधीच लॉकडाऊनमुळे तसंच महागड्या लसीच्या किंमतीमुळे जनतेची आर्थिक परिस्थिती बिघाडली असून त्यात कोविड चाचणीच्या खर्चाचा भर नको.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!