आयपीएल सट्टा : वाडे-वास्को येथे सहा जणांना अटक

संशयितांपैकी पाच नागपूर तर १ राजस्थानमधील; दोन लॅपटॉप, मोबाेईल, मोबाईल रिसिव्हिंग डिव्हाईसेस, टीव्ही, लिखाणाचे साहित्य जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः वास्को पोलिसांनी एका विशिष्ट आणि विश्वासनीय माहितीच्या आधारे वाडे येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका फ्लॅटमध्ये गुरुवारी मध्यरात्री छापा टाकून आयपीएल सट्टा उधळून लावला आहे. या कारवाईदरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे संशयितांकडून विविध प्रकारचं सामान जप्त करण्यात आलं आहे.

टोळी 19 सप्टेंबर पासून वाडे परिसरातून कार्यरत

गुप्त यंत्रणेकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. ही टोळी 19 सप्टेंबर पासून परिसरातून कार्यरत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करत आयपीएल सट्टेबाजीचा हा खेळ उधळून लावला.

6 जणांना अटक

या कारवाईदरम्यान वास्को पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयितांपैकी 4 नागपूर, 1 मध्यप्रदेश, तर १ राजस्थानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये विजय देवीलाल जट (वय वर्षं 23, राजस्थान), दिलीप नानीकरम कुरकरेजा (वय वर्षं 31, नागपूर), गुलशन इंदिरा कुमार टिक्यानी (वय वर्षं 30, नागपूर), रोहित नरेश नाडनानी (वय वर्षं 24, नागपूर), गिरीश दिवाण लालवानी (वय वर्षं 26, नागपूर) आणि प्रकाश सिंह (वय वर्षं 29, मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.

साहित्य जप्त

या छाप्यात २ लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन, फोन कॉल प्राप्त करण्यासाठी मोबाईल फोनशी जोडलेले दोन सुधारित उपकरण, एक दूरचित्रवाणी संच आणि काही लेखन साहित्य अशा सगळ्या गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत. संलग्न करण्यात आले आहे. दरम्यान सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!