आयपीएलवर सुरू होता सट्टा; पोलीस अचानक धडकले अन्…

कळंगुट येथे गुन्हे शाखेने सट्टा उधळून लावला; 4 जणांना अटक; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः आयपीएल क्रिकेट सुरू झालं असून, त्यावर सट्टा लावण्याचं प्रमाण राज्यात वाढलं आहे. उत्तर गोव्यातील बार्देस तालुक्यात येणाऱ्या कळंगुट भागात काहीजण आयपीएलवर सट्टा लावत असल्याची माहिती गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेला (क्राईम ब्रांच) मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने हा सट्टा उधळून लावला आहे.

रायबंदर येथील गुन्हे शाखेच्या पोलिस स्टेशनचे पीएसआय नितीन हळर्णकर यांना एका विशिष्ट आणि विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली की कळंगुट येथील नाईक वाडो येथे असलेल्या डिसोझा गेस्ट हाऊसमध्ये आयपीएलवर सट्टा लावण्याचा गैरप्रकार सुरू आहे.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने पीएसआय नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली पीआय राहुल परब, पीआय नारायण चिमुलकर, हेड कॉन्स्टेबल अशोक गावडे, पोलिस कॉन्स्टेबल विनायक सावंत, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश तोरसकर, आणि पोलिस कॉन्स्टेबल संदेश कांबळे यांनी डिसोझा गेस्ट हाऊवर धाड घाडली आणि 4 आयपीएल बुकी यांना रंगेहाथ ताब्यात घेतलं. त्याचप्रमाणे संशयितांकडून विविध प्रकारचं सामान जप्त करण्यात आलं आहे.

2 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केलेल्या या धडक कारवाईदरम्यान कॉल कनेक्टर डिव्हाईस, टेलिव्हिजन सेट, राऊटर, लॅपटॉप, मोबाईल्स, 6, 500 रुपये कॅश असा सुमारे 2 लाख रुपयांचं जुगाराचं साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

4 संशयितांना अटक

या कारवाईदरम्यान गुन्हे शाखेने सट्टा खेळणाऱ्या चौघांना ताब्यात घेतल्याचं समजतंय. या चौघांमध्ये प्रताप रूप सिंग (वय वर्षं 29, रा. परेवरा चुरू राजस्थान), राजवीर शंभू सिंग (वय वर्षं 30, रा. जयपूर राजस्थान), मोहन लाल रोहिताशव सिंग (वय वर्षं 33, रा. झुंझुनून राजस्थान) आणि अजय विजय सिंग यादव (वय वर्षं 33, जयपूर राजस्थान) या संशयितांना अटक करण्यात आलीये. चौघांविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या हे संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.

चौघे संशयित 28 रोजी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील थेट क्रिकेट सामन्यावर विविध ठिकाणांहून ग्राहकांकडून बेट स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेलेत.

साहित्य जप्त

या छाप्यात कॉल कनेक्टर, टीव्ही, लॅपटॉप, राऊटर, अनेक मोबाईल फोन्स आणि इतर गॅम्बलिंग साहित्य इ. जप्त करण्यात आलंय. दरम्यान या प्रकरणात पोलिस पुढील तपास करत असल्याचं समजतंय.

वाडे-वास्को येथे सहा जणांना केली होती अटक

दरम्यान 23 सप्टेंबर रोजी वास्को पोलिसांनी एका विशिष्ट आणि विश्वासनीय माहितीच्या आधारे वाडे येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका फ्लॅटमध्ये छापा टाकून आयपीएल सट्टा उधळून लावला होता. या कारवाईदरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली होती. तसंच संशयितांकडून विविध प्रकारचं सामानही जप्त करण्यात आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!