वडील, भाऊ, मित्राची चौकशी; गूढ कायम

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण; मृत्यू होऊन उलटले 15 दिवस

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा:  सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणी कळंगुट पोलिसांनी बुधवारी मयत सिद्धीच्या वडिलांसहित तिचे चुलत भाऊ, तसंच तिच्या मित्राचीही कसून चौकशी केली. पण, या चौकशीतूनही सिद्धीच्या मृत्यू प्रकरणातील गूढ उघडकीस आलेलं नसून तपास ‘जैसे थे’च आहे.

हेही वाचाः मिशन फॉर लोकल संघटनेला महिलांचा वाढता पाठिंबा

पोलिस वडिलांना घेऊन जाणार बस स्टॉपवर

पोलीस स्वतः मयत सिद्धीच्या वडिलांना या बस स्टॉपवर घेऊन जाणार आहेत. जेणेकरून या मार्गावरील एखाद्या बसमध्ये सिद्धी त्यादिवशी चढली असेल, तर त्या बसमधील रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून काही माहिती मिळू शकते का, याची तपासणी पोलीस करणार आहेत.
चौकशीदरम्यान पाच बस चालक व वाहकांना पोलीसस्थानकावर बोलावले होते. पण यातील कुणीही मयत सिद्धीच्या वडिलांना किंवा मयत सिद्धीला त्या दिवशी आपल्या बसमध्ये चढताना पाहिले नव्हते. शिवाय मयत सिद्धीच्या वडिलांनादेखील वरील संबंधितांची ओळख पटविणे शक्य झाले नाही.

पोलिसांनी बुधवारीही सिकेरी ते वागातोर या किनारपट्ट्यातील मार्केट, हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. शिवाय सिद्धीच्या गायब झालेल्या कपड्यांबाबतही शोध मोहीम राबविली. पण पोलिसांच्या हाती विशेष असे काहीच लागलेलं नाही.

हेही वाचाः गोवा-महाराष्ट्र सीमेवर तिळारीनजीक होणार जागतिक दर्जाचा ‘अम्युझमेंट पार्क’

प्रारंभी टाळलेल्या शक्यतांमधून काही निघेल?

या प्रकरणी काहीतरी ठोस पुरावे हाती लागण्यासाठी मयत सिद्धीच्याबाबतीत पोलिसांनी सुरुवातीला ज्या शक्यता टाळल्या होत्या, त्या आता पडताळण्याचे निर्देश वरिष्ठांनी कळंगुट पोलिसांना दिले आहेत.

हेही वाचाः गोव्याला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी आराखडा जारी

सिद्धी बसमधून गेली की, गेलीच नाही?

चौकशीदरम्यान पोलिसांनी मयत सिद्धीच्या वडिलांना सीसीटीव्ही फुटेजद्वारे म्हापसा-पणजी मार्गावर चाललेल्या सुमारे २५ प्रवासी बसेस दाखविल्या. पण यातील एकाही बसमध्ये आपण मुलीला कामावर जाण्यासाठी बसविले नव्हते, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पोलीस गुरुवारी सिद्धीच्या वडिलांसमवेत ग्रीनपार्क जंक्शनवर सकाळी १० ते १०.३० या वेळेत तिला नक्की कुठल्या बसमध्ये त्यांनी बसविले होते, त्या बसची प्रत्यक्षात ओळख पटवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचाः दुर्दैवी अपघात! 1 वर्षाचं बाळ सर्वांचा डोळा चुकवून घराबाहेर पडलं, अन् नको ते घडलं

संबंधितांच्या चौकशीतही धागेदोरे नाहीत

बुधवारी पोलिसांनी मयत सिद्धीचे वडील, तिचे तिघे चुलतभाऊ आणि मित्राची संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वेगवेगळी चौकशी करण्यात आली. पण, या चौकशीतूनही या प्रकरणाचा गुंता सोडविण्याच्या बाबतीत काहीच निष्पन्न होऊ शकलेलं नाही.

काय आहे प्रकरण?

11 ऑगस्ट रोजी नास्नोळा येथील 19 वर्षीय युवती सिद्धी नाईक ग्रीन पार्क जंक्शन वरून बेपत्ता झाली. सिद्धी ही पर्वरी येथे एका दुकानावर काम करत होती. 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांनी तिला प्रवासी बसमधून पर्वरीला जाण्यासाठी ग्रीन पार्क जंक्शनवर नेऊन सोडलं.

सकाळी १०.३० वा. तिच्या कामावरून ती दुकानात पोचली नसल्याचं फोन करून सांगण्यात आलं. शिवाय तिचा फोन लागत नव्हता. तिने आपला फोन घरीच ठेवलेला नंतर सापडला. याबाबत तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली.

हेही वाचाः सहकार अर्बन क्रेडिट सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमा

बेपत्ता होण्यापूर्वी सिद्धीनेच्या फोनमधील फेसबूक आणि वॉट्सएप हे दोन्ही एप डिलीट करण्यात आले होते. मात्र ते कुणी डिलीट केले हा प्रश्न अद्याप कायम आहे.

बेपत्ता असलेल्या सिद्धीचा मृतदेह 12 ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक तर्ककुतर्क व्यक्त केले जातायत. शवचिकित्सा अहवालातून सिद्धीचा मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच तिनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे अनेक तर्ककुतर्कही व्यक्त केले जातायत.

सिद्धीच्या मृत्यूचं गुढ अन् अनुत्तरीत असंख्य प्रश्न

सिध्दी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही ?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कुणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सऍप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कुणाचा दबाव होता?

19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होती की जे ती घरच्यांपासून लपवत होती?

सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता?

घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता?

हा व्हिडिओ पहाः Politics | नुकताच काँग्रेस प्रवेश केलेले मिकी पाशेको EXCLUSIVE

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!