पार्सेच्या ध्रुव स्पोर्ट्स क्लबतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

'खाजनगुंडो' बंधाऱ्यावर सादर केले विविध योग प्रकार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी


पेडणेः पार्से येथील ध्रुव स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबने पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असलेल्या ‘खाजनगुंडो’ बंधाऱ्यावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. यावेळी पतंजलीचे योग प्रशिक्षक विनायक कानोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी विविध योग प्रकार सादर केले.
यावेळी ध्रुव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांच्यासोबत क्लबचे पदाधिकारी शेखर पार्सेकर, निलेश कळंगुटकर, तुषार गोवेकर, निलेश बागकर, संदीप कांबळी, सिद्धेश नाईक, गौरेश नाईक, सितारा मांद्रेकर असे अनेक सदस्य उपस्थित होते.

योग ही आपल्या देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी

योग ही आपल्या देशाने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. तिचा उपयोग आपण करायला हवा. आपल्या ऋषी मुनींनी आरोग्य संपन्नतेसाठी योगविद्या आत्मसात केली. आजचा युवक याकडे आकर्षित होण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. ‘खाजनगुंडो’सारखा निसर्गरम्य परिसरात आज होत असलेला योग दिन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा पर्यटन स्थळांचं पावित्र्य त्यामुळे खरंच वाढणार आहे, असं ध्रुव क्लबचे अध्यक्ष दीपक कळंगुटकर म्हणाले.

योग प्रशिक्षक विनायक कानोलकर यांनी यावेळी योगासंबंधी माहिती दिली. तसंच विविध योग प्रकार करून दाखवले. या योग प्रकारांचा आपल्या आरोग्यासाठी कसा योग्य उपयोग करता येईल ते प्रात्यक्षिकासह समजावूनही सांगितलं. यावेळी निलेश कळंगुटकरांनी उपस्थितांचे आभार मानले.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!