आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

शुक्रवारी पार पडली बैठक; चक्रीवादळात २००४ घरे/खासगी तसंच सरकारी इमारतींच्या मालमत्तांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आल्तिन पणजी येथील वन भवनात एमएचएचे संयुक्त सचिव आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील आंतरमंत्रालयीन पथकाने शुक्रवारी तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याकरिता सर्व संबंधित खात्यांची बैठक घेतली.

हेही वाचाः १८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

बैठकीला विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती

बैठकीस अर्थ मंत्रालयाचे उप-संचालक शलाका कुजूर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंह, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रांजल बुरागोहेन, ग्रामीण विकास मंत्रालयाचे साहाय्यक आयुक्त आयुष पुनिया, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक जितेश श्रीवास आणि मत्स्योध्योग खात्याचे वैज्ञानिक डॉ एच.डी प्रदीप उपस्थित होते.

हेही वाचाः बँक ग्राहकांना झटका; ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल

चक्रीवादळात २००४ घरे/खासगी तसंच सरकारी इमारतींच्या मालमत्तांचं नुकसान

सुरुवातीस महसूल खात्याचे सचिव आयएएस संजय कुमार यांनी समिती सदस्यांना गोव्यात तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामाची माहिती दिली आणि नुकसानीचा आढावा घेतला. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन देताना संजय कुमार यांनी या चक्रीवादळामुळे गोवा राज्यातील वीज, पाणी आणि दूरसंचार नेटवर्कचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं सांगितलं. चक्रीवादळाने तीन लोकांचा जीव घेतला असून राज्य सरकारतर्फे त्यांच्या कुटुंबियाना आर्थिक मदत देण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे सुमारे २००४ घरे/खासगी तसंच सरकारी इमारतींच्या मालमत्तांचं नुकसान झालं आहे. पिकांचंही बरंच नुकसान झालं आहे. कृषी अहवालाच्या आधारे नुकसान भरपाई देण्यात आल्याचं सचिवांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचाः गोवा विमानतळावर ‘आयसीएमआर’ने मंजूर केलेल्या चाचण्यांना मान्यता

एमएचएच्या सदस्यांना १५३ कोटीच्या नुकसानीचा अहवाल सादर

महसूल सचिवांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अंदाजे १५३ कोटीच्या नुकसानीचा अहवाल तयार करून एमएचएच्या आंतरमंत्रीय केंद्रीय पथकाच्या सदस्यांना सादर केला आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर कृषी, मत्स्योध्योग, सार्वजनिक बांधकाम खाते, वीज खाते, जलस्त्रोत खाते, अग्निशमन आणि आपत्कालीन तसंच माहिती आणि तंत्रज्ञान खात्याच्या प्रतिनिधींनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. गोवा सरकारच्या सचिवांनीही एमएचए पथकाशी संवाद साधला, असे माहिती खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!