प्रशासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने जारी केलं परिपत्रक

अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे दिले निर्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यात वाढणाऱ्या कोविड महामारीच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 9 मे रोजी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा केली होती. त्यानंतर मध्यंतरी दोन वेळा या कर्फ्यूचा काळ वाढवण्यात आला. राज्यात 7 जूनपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलाय.

हेही वाचाः विद्यापीठ, कॉलेज शिक्षकांना कामावर रुजू होण्याचे निर्देश

राज्यव्यापी कर्फ्यूमुळे शिक्षण संचालनालयाने प्रशासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. मात्र आता हळुहळू परिस्थिती पूर्वपदावर येतेय म्हटल्यावर शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी करत प्रशासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे निर्देश दिलेत.

शिक्षण संचालनालयाचे निर्देश

राज्यातील कोविड आकडेवारी हळुहळू घटतेय. परिस्थिती हळुहळू सुधारतेय. 7 जून हा राज्यातील कर्फ्यूचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हळुहळू आता राज्यातील सर्व व्यवहार सुरू होतायत. शिक्षण संचालनालयानेही परिपत्रक जारी करत अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थेतील सर्व प्रशासकीय आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास सांगितलंय. शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7 जूनपासून कामावर रूजू होण्यास सांगिण्यात आलंय.

शुक्रवारी राज्यातील कोविड आकडेवारी

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोना रुग्णवाढ घटली आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येतही कमालीची घट झाली आहे. दैनंदिन आकडेवारीत नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. राज्यात शुक्रवारी 576 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालंय. ज्यापैकी 503 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 73 कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे नव्या रुग्णांच्या तिप्पट रुग्ण हे कोरोनातून बरे झाल्याची नोंद शुक्रवारी करण्यात आली आहे. एकूण 1 हजार 160 कोरोना रुग्ण बरे झाले आहे. त्यापैकी 95 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्जही देण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!