महागाईचा चटका अजून वाढला, आता अंडी पण महाग झाली

मासे, चिकननंतर आता अंड्यांचे भाव चढेल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः लॉकडाऊनमध्ये नागरिकांना आर्थिक फटका बसला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, तर काहींचे उद्योग धंदे बंद पडले. हळुहळू परिस्थिती सुधारतेय. अशा परिस्थितीत महागईने तोंड वर काढलं आहे. इंधन, गॅस दरवाढीनंतर आता अंड्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

मासे, चिकननंतर आता अंड्यांचे भाव चढेल

श्रावण तसंच चतुर्थीतील शाहाकार संपल्यानंतर मांसाहाराकडे वळलेल्या गोंयकारांना मासे, चिकननंतर आता अंडी चढेल भावात विकत घ्यावी लागत आहेत. चतुर्थीनंतर अंड्यांचे भावही भडकले आहेत. सध्या अंड्यांचे भाव प्रति शेकडा २० ते ३० रुपयांनी वाढले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अंडे प्रति शेकडा ४३० रुपये होते. चतुर्थीपर्यंत हा दर प्रति शेकडा ४६० वर पोहोचला होता. पुढील काही दिवसांत अंड्यांचे भाव ५०० चा आकडा ओलांडण्याची संभावना व्यावसायिकांकडून व्यक्त केली जाते.

किरकोळ बाजारात अंडी ६० रुपये प्रति इझन

किरकोळ बाजारात अंडी ६० रुपये प्रति इझनप्रमाणे विकली जातायत. शहरात अंड्यांचा भाव वाढलेला असला तरी ग्रामीण भागात मात्र अंडी प्रति डझन ६५ ते ७० रुपये याप्रमाणे विकण्यात येत आहेत. डझनावरील भाव ५ रुपयांनी वधारला आहे. चिकन १५० रुपये अंड्याप्रमाणे चिकनही प्रति किलो महागलं आहे.

मागील काही दिवसांत त्यात ३० रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर येतेय. त्यात आणखीन किरकोळ वाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!