भारताच्या दीपिका कुमारीने अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडिसला चारली धूळ !

टोकियो ऑलिम्पिकमध्ये दीपिकानं पटकावलं अंतिम १६ मध्ये स्थान !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज दीपिका कुमारीने अपेक्षेप्रमाणे कामगिरी बजावत अंतिम १६ मध्ये स्थान पटकवले आहे. तिने अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो फर्नांडिसचा ६-४ असा पराभव केला आहे. ती आता पदकाच्या जवळ पोहचली आहे.

दीपिका कुमारीने अमेरिकेच्या जेनिफर फर्नांडिसचा पराभव केला. पहिला सेट दीपिकाने गमावला होता. दीपिकाने पहिल्या सेटमध्ये २५ गुण मिळवले होते. तर, फर्नांडिसने २६ गुण मिळवले होते. मात्र तिने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेत २८ गुण मिळवले तर फर्नांडिसला २५ गुण मिळाले. तिसरा सेट देखील दीपिकाने जिंकला, यामध्ये तिला २७ गुण मिळवले तर, फर्नांडिसला २५ गुणच मिळवता आले.

२००९ मध्ये युवा विश्वचषक स्पर्धेत १५ व्या वर्षी विजेतेपद पटकावणाऱ्या दीपिकाने मग २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदके कमावली. परंतु २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ आपला प्रभाव दाखवू शकला नाही. मग पुढील चार वर्षांनी रिओमध्येही भारताने तोच कित्ता गिरवला. कारकीर्दीतील तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान नावावर असणाऱ्या दीपिकाला तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले. परंतु गेल्या पाच वर्षांत रांचीच्या दीपिकाची कामगिरी कमालीची सुधारली आहे. पाच विश्वचषक पदके तिच्या नावावर आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!