कोरोना संकटात ‘सेवा आणि सहकार्याचा’ भारताचा संकल्प !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे संबोधन

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे संबोधन केले. या जागतिक साथीच्या काळात भारत ‘सेवा आणि सहकार्याचा’ संकल्प घेऊन मार्गक्रमण करत आहे. आम्ही पहिल्या लाटेत देखील जोमाने संघर्ष केला, यावेळी देखील विषाणू विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत भारत विजयी होईल. ‘सहा फुटाचे अंतर’ मास्कशी संबधित नियम किंवा मग लस संबंधीचे नियम असू देत आम्हाला निष्काळजीपणा करून चालणार नाही. हाच आपला विजयाचा मार्ग आहे, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.