सासष्टीत चेन स्नॅचिंगसह मोबाईल हिसकावून पळ काढण्याच्या घटनांत वाढ

गेल्या महिनाभरात सात तक्रारी नोंद; कोलवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच 4 तक्रारी, तर मडगाव, वार्का, ओर्ली ब्रिज, बाणावली आणि कुडतरीत मिळून 6 घटनांची नोंद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सासष्टी तालुक्यात चेन स्नॅचिंगसह (सोनसाखळ्या चोरी प्रकरणे) मोबाईल हिसकावून पळ काढण्याच्या घटनांत वाढ झालीय. या प्रकारांमुळे नागरिकांत घबराट पसरली असून चोरांचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

हेही वाचाः खूशखबर! गोव्यातील पेन्शन धारकांनाही आता वाढीव डीए लागू

गेल्या महिनाभरात सात तक्रारी नोंद

दक्षिण गोव्यात सोनसाखळ्या आणि मोबाईल हिसकावण्याचे प्रकार जुलै महिन्यापासून वाढलेत. सासष्टी तालुक्यात गेल्या महिनाभरात सात तक्रारी नोंद झाल्या. कोलवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतच चेन स्नॅचिंगच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्या. तर मडगाव, वार्का, ओर्ली ब्रिज, बाणावली आणि कुडतरीत मिळून अशा सहा घटनांची नोंद करण्यात आलीय. पेर सेरावली इथं मोबाईल हिसकावण्याची घटना घडली. स्कुटरवरून आलेल्या दोघा तरुणांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं फोनवर बोलणार्‍या माणसाचं लक्ष विचलित केलं आणि त्याचा मोबाईल हिकावून बेताळभाटीच्या दिशेनं पोबारा केला.

या प्रकरणात अद्याप कोणाताही सुगावा नाही

तक्रार दाखल झाल्यानंतर कोलवा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र या प्रकरणात अद्याप कोणाताही सुगावा लागलेला नाही. मायणा कुडतरी पोलिसांनी अशाच एका प्रकारात तळेबांद-दवर्ली इथल्या इस्माईल शेख याला अटक केली. स्कुटरवरून आलेल्या इस्माईल यानं मुगाळी कुडतरी इथं मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता.

अशा घटनांत वाढ झाल्यानं नागरिकांत घबराट पसरी असून चोरांचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | BJP | भाजपच्या राष्ट्रीय महिला सरचिटणीस सुखप्रित कौर गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!