महाराष्ट्र आणि गोव्यात प्राप्तिकर विभागाचे छापे

3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्‍लीः प्राप्तिकर विभागाने 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत जप्तीची कारवाई केली. हा समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथील एक नामांकित पोलाद उत्पादक आणि व्यापारी आहे. 44हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.

हेही वाचाः ‘त्या’ रशियन महिलेचा खून झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट

छापे आणि जप्तीच्या मोहिमेदरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तऐवजांचे कागद आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.

फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतलेला समूह

छापे टाकून केलेल्या कारवाई दरम्यान सापडलेल्या पुराव्यांमुळे हे उघड झालं आहे की, हा समूह विविध ‘बनावट पावत्या जारी करणाऱ्यांकडून भंगाराची आणि स्पंज आयर्नची खरेदी करण्याच्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतला होता. या कारवाई दरम्यान बनावट पावत्या जारी करणाऱ्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. अशा पावत्या देणाऱ्यांनी कबूल केलं आहे की, त्यांनी केवळ देयके पुरवली मात्र ज्याची देयके होती ते साहित्य पुरवलेलं नाही.खरोखर खरेदी केल्याचं दाखविण्यासाठी आणि जीएसटी इनपुट क्रेडीटचा दावा करण्यासाठी बनावट ई-वे देयके देखील निर्माण करण्यात आली. पुण्याच्या जीएसटी प्राधिकरणाच्या सक्रीय पाठिंब्याने, बनावट ई-वे देयके ओळखण्यासाठी “व्हेईकल मुव्हमेंट ट्रॅकिंग एप” चा वापर करण्यात आला. या समूहाने दाखवलेली एकूण बनावट खरेदी, आतापर्यंत सुमारे 160 कोटी रुपयांची असल्याचं निष्पन्न झालं आहे.

हेही वाचाः युवतीवर हल्ला केल्याप्रकरणी संशयित ओंकार धनंजय कवळेकर याला अटक

3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड, 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त

विविध ठिकाणांवरून 3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 1.34 कोटी रुपयांचे 194 किलो चांदीच्या बेहिशेबी वस्तूंही या कारवाई दरम्यान सापडल्या. करपात्र व्यक्तीने हे स्वीकारले असून हे अतिरिक्त उत्पन्न म्हणून घोषित केले आहे. या कारवाई दरम्यान आतापर्यंत, बेहिशेबी रोकड आणि दागिने, कमी आणि अतिरिक्त साठा आणि बोगस खरेदी यांचा समावेश असलेले 175.5 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | Congress | दोन दिवसीय दौऱ्यानंतर चिदंबरम यांची पत्रकार परिषद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!