बलिदान दिलेल्या कोविड योध्दयांच्या कुटुंबियाला शासकीय नोकरीत सामावून घ्या !

गोवा फाॅरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्याकडं मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आपले प्राण धोक्यात घालुन आज कोविड योध्दे गोयकारांचे कोविडपासून रक्षण करत आहेत. सध्या गोयकारांसाठी हे योगदान लाख मोलाचं आहे. ज्या कोविड योध्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या कोविड योध्यांच्या कुटुंबियाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं, अशी मागणी गोवा फाॅरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडं केलीय.

गोयकारांना वाचवण्यासाठी कोविड योध्यांचे प्राण धोक्यात
मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना दिलेल्या पत्रात ते म्हणतात की, कोरोना व्हायरसच्या अतिशय जीवघेण्या अशा वातावरणात कोविड योध्दे अहोरात्र कार्यरत असतात. आमच्या गोयकारांचे प्राण वाचवण्यासाठी ते आपले प्राण धोक्यात घालतात. त्यांच्या कुटूंबातले ते अत्यंत प्रिय व्यक्ती असतात. त्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाह पुर्णपणे त्यांच्यावरच अवलंबुन असतो. त्यामुळं त्यांच्या कुटूंबासाठी ते खुप महत्वाचे असतात.

कोविड योध्देच आमचे खरे नायक !
आम्हा गोयकारांचे प्राण वाचवण्यासाठी आज सर्व कोविड योध्दे अहोरात्र संघर्ष करत आहेत. त्यांना न्याय देणं आपलं कर्तव्य आहे. त्यांच्यामुळं आज आमचे राज्य सुरक्षित आहे. त्यांचे बलिदान आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळं ज्या कोविड योध्यांनी आपलं बलिदान दिलं, त्या कोविड योध्यांच्या कुटुंबियाला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!