माणुसकीला काळिमा फासणारी घटना! जन्मदात्याकडून मुलीचं लैंगिक शोषण

संशयित वडिलांस अटक; २०१७ ते बुधवारी १५ सप्टेंबर २०१९ या काळात पीडितेवर अत्याचार

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा: पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी संशयित वडिलांस अटक केली आहे.

19 वर्षीय फिर्यादीने दाखल केली तक्रार

हा माणुसकीला काळिमा फासणारा लैंगिक अत्याचाराचा प्रकार २०१७ ते बुधवारी १५ सप्टेंबर २०१९ या कालावधीत घडला. 19 वर्षीय फिर्यादीने बुधवारी दुपारी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, संशयिताने दारूच्या नशेत मद्यधुंद होऊन हा अत्याचार केला आहे. संशयित वडिलाने पीडित मुलीचं लैंगिक शोषण केलं. गेले दोन वर्षं तिच्यावर अत्याचार केला. शिवाय तिच्या आईला देखील शिवीगाळ करीत दोघांनाही मारहाण केली. या मारहाणीत दोघींनाही शारीरिक इजा झाली असून संशयिताने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली आहे.

संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध भा.दं.सं.च्या ३५४, ३७६, ५०४, ३२३, ५०६ (२ ), गोवा बाल कायदा कलम ८ व पोस्को कायदा कलम ४, ८, १२ खाली गुन्हा नोंद केला आणि संशयितास अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

हा व्हिडिओ पहाः GOA GANESH DECORATION | मंदार शेटगावकर यांनी साकारला ‘पुतना वध’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!