शिक्षकी पेशाला काळीमा! ट्युशन देण्याच्या नावाखाली विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसाः येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडलीये. शिक्षकाने भक्षकाचं रूप घेऊन चिमुरडीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आल्याने म्हापसा शहरातून संताप व्यक्त केला जातोय. शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल प्रकार घडले, तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा सवाल विचारला जातोय.
नक्की काय झालं?
म्हापसा शहरात ट्युशन देण्याच्या नावाखाली एका ७ वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडलीये. ४७ वर्षीय ट्युशन शिक्षकाकडून हा घृणास्पद प्रकार घडल्याची माहिती म्हापसा पोलिसांकडून मिळाली आहे. मुलीला घरी ट्यूशन देण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाकडून हे कृत्य झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे.
पोलिसांकडून नराधमाला अटक
घडल्या घृणास्पद प्रकाराची पीडितेच्या पालकांनी पोलिसांत तक्रार करताच संशयित शिक्षकाला म्हापसा पोलिसांकडून अटक करण्यात आलीये. दरम्यान नक्की काय घडलंय, हा प्रकार कधी घडला, याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तरी या प्रकारात पोलिस तपास सुरू आहे.