मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्सचे ५ ऑगस्ट रोजी उद्घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन; माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांची माहिती

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मांद्रे कॉलेज ऑफ कॉमर्स इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाचं उद्घाटन गुरुवार ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वा. मांद्रेत होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या महाविद्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते, मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे, गोवा विद्यापीठाचे वाईस चान्सलर वरूण सहानी, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगांवकर, मांद्रेचे सरपंच सुभाष आसोलकर, वकील सुरेंद्र सरदेसाई, वास्तुशिल्पकार नंदन सावंत यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मांद्रे विकास परिषदेचे अध्यक्ष रमाकांत खलप यांनी दिली. २ ऑगस्ट रोजी महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचाः बाल शौर्य पुरस्कारासाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

गेली 40 वर्षं शैक्षणिक संस्था कार्यरत

मांद्रे विकास परिषद ही शैक्षणिक संस्था मागची चाळीस वर्षं शैक्षणिक क्षेत्रात आहे. शिक्षण क्षेत्रात विद्या दानाचं कार्य करत असताना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा निर्माण केल्या. मध्यंतरी या शैक्षणिक संस्थेला ग्रहण लागलं होतं. या संस्थेत राजकारण घुसवून संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. त्याविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले. न्यायालयातील खटले संस्था जिंकली आणि विद्यार्थी शिक्षण आणि संस्थेचा विजय झाला, असं खलप म्हणाले. या महाविद्यालयासाठी ज्यांनी योगदान दिलं, त्यांचा या महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार होणार आहे, असं खलप म्हणाले.

हेही वाचाः डी. पुरंदेश्वरी यांनी घेतलं महालक्ष्मी देवीचं दर्शन

या पत्रकार परिषदेला डॉ. प्रतीक्षा खलप, नारायण नाईक, मुख्याध्यापक मोहनदास चोडणकर, प्रा. सुमेक्षा गावकर आणि प्रा. अरुण नाईक यांची उपस्थिती होती.

हा व्हिडिओ पहाः Video | Journalist day | बार्देश तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!