कोलवाळ पोलिस स्थानकाचे 18 रोजी उद्घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या हस्ते होणार शुभारंभ

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः थिवी मतदारसंघासाठी सरकारने मंजूरी दिलेल्या कोलवाळ पोलिस स्थानकाचं लोकार्पण 18 रोजी क्रांतीदिनी सकाळी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक आमदार निळकंठ हळर्णकर, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना, इतर पोलिस अधिकारी, कोलवाळसह मतदारसंघातील इतर पंचायत सदस्य उपस्थित असतील. उद्घाटनाचा कार्यक्रम हा छाटाखानी असेल.

हेही वाचाः कुठ्ठाळीत पावसाचं पाणी शिरलं घरात

2019 मध्ये नव्या पोलिस स्थानकाला मंजूरी

मुशीरवाडा कोलवाळ येथील जलस्त्रोत खात्याच्या इमारतीत हे पोलिस स्थानक सुरू होणार आहे. सरकारने 2019 मध्ये थिवी मतदारसंघासाठी कोलवाळ येथे बार्देश तालुक्यातील नवीन पोलिस स्थानकाला मंजूरी दिली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या पोलिस स्थानकासाठी पर्यायी जागेची शोधाशोध खात्याने चालविली होती. सुरुवातील कोलवाळमध्येच भुखंड संपादीत करून त्यात इमारत उभारावी असा प्रस्ताव होता. पण इमारतीच्या बांधकामाला बराच अवधी लागणार असल्याने या भुखंडासह इमारतीचे बांधकाम होईपर्यंत सरकारच्या विना वापर असलेल्या इमारतींमध्ये पोलिस स्थानकाचं कामकाज सुरू करण्यावर पोलिस महासंचलकांनी भर दिला.

हेही वाचाः बार्देशमध्ये सतंतधार पावसामुळे पडझड

अधिसूचना सरकारने जाहीर केल्यानंतर स्पष्ट

त्यानुसार जागेची शोधाशोध करून मुशीरवाडा येथील जलस्त्रोत खात्याची विनावापर असलेल्या इमारतीत हे पोलिस स्थानक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चालू महिन्यापासून म्हापसा पोलिसांकडून ही इमारत पोलिस स्थानकासाठी तयार करण्यात आली आहे. कोलवाळ, रेवोडा, नादोडा, पिर्ण, अस्नोडा, सिरसई, थिवी आणि कामुर्ली ही आठ पंचायत क्षेत्र थिवी मतदारसंघात येतात. या सर्व पंचायती या पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिसूचना सरकारने जाहीर केल्यानंतर स्पष्ट होईल.  

हेही वाचाः नोकरभरती बंदीचा मी खलनायक नाही! 

लोकांची गैरसोय दूर होणार

थिवी मतदारसंघातील लोकांना अडीअडचणीसाठी म्हापसा पोलिस स्थानक गाठावं लागत होतं. त्यामुळे मतदारसंघात पोलिस स्थानक व्हावं अशी लोकांची इच्छा होती. त्यानुसार सरकारने कोलवाळ पोलिस स्थानकाला मंजूरी दिली होती आणि हे पोलिस स्थानक आता प्रत्यक्षात कार्यरत होत असल्यानं लोकांची गैरसोय दूर होईल, अशी माहिती आमदार निळकंठ हळर्णकर यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!