पोर्तुगीजकालीन इतिहास समोर आणण्याची गरज

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : नव्या पीढीसमोर आमचे पूर्वज तसेच पोर्तुगीजकालिन इतिहास आणण्याची गरज आहे. अॅड. उदय भेंब्रे यांनी ‘व्हडले घर’ या कादंबरीत इन्क्विजिशनचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला, असे उद्गार नामवंत हृदयविकारतज्ज्ञ तथा साहित्यिक डॉ. कस्तुरी मोहन पै यांनी काढले.
हेही वाचाः Breaking | अर्थसंकल्पीय अधिवेशाची तारीख ठरली! 24 मार्चचा मुहूर्त
‘व्हडले घर’ कादंबरीचे प्रकाशन
अॅड. उदय भेंब्रे यांच्या ‘व्हडले घर’ कादंबरीचं बुधवारी सायंकाळी प्रकाशन झालं. प्रकाशक संजना पब्लिकेशनने आयोजित केलेल्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. कस्तुरी मोहन पै प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या या सोहळ्यात डॉ. रमिता गुरव या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय सामाजिक, राजकीय तसेच साहित्यिक क्षेत्रांतील अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.

पोर्तुगीजकालीन इतिहास सांगणारी कादंबरी
डॉ. भेंब्रे हे माझे मित्र आहेत. त्यांना मी मामा म्हणतो. लहानपणी माझी आई मला गोष्टी सांगायची. आम्ही गोव्यातून कर्नाटकात गेलो. कर्नाटकात पहिली कोकणी भाषेतून लिखाण व्हायचं. या गोष्टी ऐकल्यास पूर्वजांचा इतिहास शोधण्याच गरज आहे. गोव्यातील पोर्तुगीज राजवट, बाटवाबाटवीचा काळ आणि इन्क्विजिशनचा काळ हा इतिहास भावी पिढीसमोर ठेवणं आवश्यक आहे. ‘व्हडले घर’ ही कादंबरी तोच इतिहास समोर ठेवत आहे, असे डॉ. कस्तुरी मोहन पै यावेळी म्हणाले.
हेही वाचाः महत्त्वाचं! सिलिंडरचं अनुदान संपुष्टात येण्याची शक्यता, कारण…
वाचनीय कादंबरी – डॉ. रमिला गुरव
‘व्हडलें घर’ या कादंबरीतून इतिहासाचा बोध होतो. इतिहासाचे विकृतीकरण कादंबरीत नाही. तिची मांडणी कलात्मरित्या करण्यात आली असून अतिशय वाचनीय आहे. लेखकांमधील कवीचे दर्शन कादंबरी वाचताना होते. कादंबरीत काही पोर्तुगीज भाषेतील उतरं आहेत. गोव्याच्या कोकणीवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव होता. इन्क्विजिशनचा काळ कसा होता, याचा अंदाज कादंबरी वाचल्यानंतरच येतो, असं डॉ. रमिला गुरव म्हणाल्या.
हेही वाचाः 30 टक्के घरांची वीज तोडली! बिलं थकवल्याचा फटका, तुम्ही बिल भरताय ना?
पोर्तुगीज राजवटीत इन्क्विजिशन काळाचा इतिहास वाचनीय व्हावा, यासाठी ही कादंबरी लिहिली, असे लेखक अॅड. उदय भेंब्रे यांनी प्रस्तावनेत स्पष्ट केले. ऊर्जिता भोबे यांनी सूत्रनिवेदन केले. संजना पब्लिकेशन्सचे प्रतिनिधी दिनेश मणेरकर यांनी आभार मानले.