राज्यात ‘या’ तारखेपासून पावसाचं पुन्हा धुमाशान…

हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दक्षिण अंदमानजवळ समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या प्रभावाने बंगालच्या उपसागरात आग्नेय दिशेला कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी ७ व ८ डिसेंबर दरम्यान तामिळनाडू व आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. याचा गोव्यावर फारसा परिणाम होणार नसला तरी वातावरण दमट राहणार आहे.
हेही वाचाःइस्रो हेरगिरी प्रकरणातील आरोपींना तूर्त जामीन नाहीच…

हलक्या व मध्यम सरी बरसण्याचा अंदाज

ढगाळ वातावरण तयार होऊन राज्यात ९ व १० डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. २ व ३ तारखेला सिंधुदुर्ग परिसरात ढग तयार झाले होते. मात्र, ते फारसे नसल्याने पाऊस झाला नाही, अशी माहिती हवामान खात्याचे शास्त्रज्ञ राहुल मोहन यांनी दिली.
हेही वाचाःMopa Airport | मोपा विमानतळाला पर्रीकरांचे नाव!

राज्यातील तापमानाची आकडेवारी

शनिवारी पणजीत कमाल ३३.८ अंश डिग्री सेल्सिअस व किमान २४. अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मुरगावमध्ये कमाल ३२.६ व २४.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचाःGoa Crime | रिसॉर्टमधील रूमबॉयनीच केला रशियन तरुणीवर बलात्कार…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!