गेल्या 7 महिन्यात राज्यात 17 बलात्कार प्रकरणांची नोंद

महिलांसाठी गोवा बनतोय असुरक्षित; बलात्काराच्या प्रकरणांमध्ये झाली वाढ

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः एका अहवालानुसार भारतात एकूण गुन्हेगारीमध्ये बलात्कार हा गुन्हा अव्वल क्रमांकावर येतो. दरवर्षी साधारण तीस ते चाळीस हजार बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद देशात होते. हे झाले नोंद झालेल्या गुन्ह्यांबद्दल; पण अनेक प्रकरणात बलात्काराची नोंददेखील केली जात नाही किंवा अशी प्रकरणे दाबली जातात. अजून एक दुर्दैवी बाब म्हणजे, बलात्काऱ्यांना शिक्षा मिळण्याची आकडेवारी फारशी समाधानकारक नाही. दुर्दैवाने दिवसेंदिवस या गुन्ह्याची आकडेवारी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. त्यातही गोव्यात बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली दिसतेय. आणि एकूणच गुन्हेगारीचं प्रमाणही बरंच वाढलंय.

हेही वाचाः वाळपई अल्पवयीन बलात्कार प्रकरणः अक्षय नाईकला पाच दिवसांची पोलिस कोठडी

हेही वाचाः काय चाललंय काय? केपेत आसाममधील तरुणीवर बलात्कारानं खळबळ

हेही वाचाः राज्यात पुन्हा अल्पवयीन मुलींवर बलात्कार, पोलीस असल्याचा बहाणा करत अत्याचार

हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील संशयित रहिम खान याला उत्तरप्रदेश मुरादाबाद येथून अटक

गेल्या 7 महिन्यात राज्यात 17 बलात्काराची प्रकरणे

गेल्या 7 महिन्यात राज्यात 17 बलात्कार प्रकरणांची नोंद झाली आहे. हा आकडा धक्कादायकच म्हणायला हवा. मागच्या 7 महिन्यांध्ये 14 बलात्कार, 12 विनयभंग आणि 15 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांची नोंद झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला 1 जानेवारी ते 30 जून 2021 पर्यंत दक्षिण गोवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण 382 गुन्हे दाखल झाले आहेत. आणि धक्कादायक म्हणजे, या काळात खूनाच्या सहा घटना घडल्या आहेत, म्हणजे दक्षिण गोव्यात दरमहा एक खून होतो आहे.

नुकतंच झालेलं वाळपईतील अल्पवयीन बलात्कार प्रकरण, केपेमध्ये आसाममधील तरुणीवर 29 जुलै रोजी झालेला बलात्कार, बाणवलीत झालेलं सामूहिक बलात्कार प्रकरण, म्हापशात झालेला अल्पवयीन मुलीवरील बलात्कार इ. प्रकरणे ताजी आहेत. गोव्यात महिला किती सुरक्षित आहेत, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ही प्रकरणं पुरेशी आहेत.

हेही वाचाः म्हापशात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हेही वाचाः 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

हेही वाचाः धक्कादायक! 6 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, 21 वर्षीय तरुणाला अटक

हेही वाचाः सामूहिक बलात्कार : पीडित युवतीचा अखेर मृत्यू

पोलिसांनी सतर्कता दाखवण्याची आवश्यकता

सध्या राज्यात महिलांवरील वाढते अत्याचार हा गंभीर विषय बनला आहे. आता पोलिसांनी अधिक सतर्कता दाखवण्याची आवश्यकता आहे. छोटी छोटी प्रकरणेदेखील पोलिसांनी तातडीने सोडवून राज्यातील गुन्हेगारांच्या मनात पोलिसांची भीती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुन्हेगारीचं प्रमाण असंच वाढत राहिलं, तर गोव्याचं रुपांतर दिल्ली, बिहार, यूपीमध्ये होण्यास वेळ लागणार नाही. अन् राज्यातील स्त्रिया मुली बिनधास्त घराबाहेर पडू शकणार नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | Rape | Crime | आणखी एका तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनं खळबळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!