गेल्या 48 तासांत कोरोनामुळे राज्यात ९ रुग्ण दगावले!

मंगळवारी 5 तर बुधवारी 4 रुग्णंचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीतून पुन्हा एकदा मृत्यूदराची चिंता वाढू लागली आहे. कारण मंगळवारनंतर बुधावरीही पुन्हा मृतांचा आकडा हा चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे. राज्यात मंगळवारी 5 रुग्ण कोरोनामुळे दगावल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची आकडेवारी आरोग्य विभागानं जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमधून देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा हा आता 3 हजार 312वर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नवे 83 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 82 रुग्ण कोरोनातून बरे झाले. नव्यानं निदान झालेल्या कोरोना रुग्णांपैकी 68 रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर 15 रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्याच्या घडाली एकूण 830 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्याचा रिकव्हरी रेट हा 97.65 टक्के इतका नोंदवण्यात आलाय.

शाळा सुरु होणार लवकरच

दरम्यान, दुसरीकडे राज्यातील शाळादेखील लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञ समिनीनं शाळा सुरु करण्याबाबत सरकारलाही हिरवा कंदील दिलेला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनाही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा शाळा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. मार्गदर्शक तत्त्व जारी करत लवकरच पुन्हा नववीचे वर्ग भरवले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर दुसरीकडे राज्याच्या मृत्यूदरावरुनही चिंता व्यक्त केली जाते आहे.

मृतांचा आकडा हा अचानक वाढत असल्याचं गेल्या दोन दिवसांत दिसून आलंय. राज्यातील पर्यटनविषयक उपक्रमही आता पुन्हा एकदा वेग पकडू लागले आहेत. अशा पार्श्वभूमीवर वाढता मृत्यूदर नियंत्रणात ठेवणं, हे आरोग्य यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण राज्याचं लसीकरण पूर्ण करण्याचं ध्येयही सरकारनं बाळगलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. परिणामी सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं जातंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!