मये मालमत्ताप्रश्नी सुनावणी डिचोलीत

उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्णय : एकच पुरावा सादरीकरणास अनुमती

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोली : मये मालमत्ता संदर्भातील प्रलंबित दावे तातडीने निकालात  काढण्यासाठी  मुख्यमंत्री  डॉ.  प्रमोद  सावंत  यांनी  उच्चस्तरीय  बैठक  घेऊन  महत्त्वाचे  निर्णय  घेतला आहे,
अशी माहिती  आमदार प्रेमेंद्र  शेट यांनी  दिली. पूर्वी तीन-तीन  कागदपत्रे व दस्तऐवज सादर करण्याची सक्ती करण्यात  आली  होती.  ते बंधन शिथिल  करून आता  केवळ  एकच  पुरावा उपलब्ध  करून सनदीसाठी अर्ज  मंजूर  करा. तसेच सुनावणी  सलग सात  दिवस घेऊन प्रलंबित  खटले  निकालात  काढा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. यामुळे मयेवासीयांना  मोठा दिलासा  मिळणार आहे, असे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.
हेही वाचा:मणिपूरमध्ये ५५ जवान ढिगाऱ्याखाली; ८ ठार!

तांत्रिक व कायदा दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

आमदार प्रेमेंद्र शेट पुढे म्हणाले, मयेतील  लोकांना  सनदी  बहाल  करता  याव्यात  यासाठी  सरकार  सर्व पर्यायांची चाचपणी करत आहे.  कोणताही एक  दस्तावेज  देऊन  प्रक्रियेला  चालना दिली  जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व  कायदा  दुरुस्ती  करण्याचे  आदेश  मुख्यमंत्र्यांनी  दिले आहेत. मये  प्रश्न शंभर  टक्के  सोडवण्यासाठी सरकार कार्यरत  असून गतिमान  पद्धतीने  चालना  दिली जाणार आहे. एकूण १,८२२ दावे असून त्यांतील  ४२२ दावे  निकालात    काढण्यात  आले आहेत. उर्वरित  दाव्यांची  प्रक्रिया  जलद  गतीने  पूर्ण करण्याचे आदेश  देण्यात आले आहेत, असेही आमदार प्रेमेंद्र शेट  यांनी  स्पष्ट केले. 
हेही वाचा:गोव्याला कौशल्य विकास संस्थांची गरज… ‍

आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्यांचे विशेष अभिनंदन

या बैठकीला आमदार प्रेमेंद्र शेट, ॲटर्नी जनरल देविदास पांगम, महसूल खात्याचे अधिकारी,  जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार व इतर अधिकारी तसेच समितीचे सदस्य शेखर नाईक व अर्जुन नाईक उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी मये प्रश्नी विशेष लक्ष घालून जलद गतीने  दावे  निकालात काढण्यासाठी यंत्रणा सज्ज केल्याबद्द्ल आमदार प्रेमेंद्र शेट यांनी त्यांचे विशेष अभिनंदन  केले. 
हेही वाचा:जमीन हडप प्रकरणातील आणखी एक मासा गळाला ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!