कणकवलीत चोरट्यांनी एका रात्रीत फोडली सहा दुकानं

चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी धाडसी चोरी

उमेश बुचडे | प्रतिनिधी

कणकवली : कणकवली शहरात गणेश उत्सवानिमित्त घरी गेलेल्या दुकानमालकांच्या दुकानावर चोरट्यांनी डल्ला मारला. शहरातील एस. एम. हायस्कूलसमोरील बाबा भालचंद्र मॉल येथील दोन दुकाने फोडली असून शेजारीच असलेल्या चिंतामणी बिल्डिंगमधलीही दोन दुकानांची शटर तोडून रोख रक्कम चोरून नेली आहे.

शहरातील तब्बल सहा दुकानगाळे चोरट्यांनी फोडले. ही घटना शुक्रवारी रात्री ११.३० नंतर तर काही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. यात तीन दुकानांमध्ये मिळून जवळपास ३० हजार रुपये चोरीस गेले आहेत. चोरट्यांनी फोडलेल्या दुकानांमध्ये कापड दुकान, फोटो स्टुडिओ, वैद्यकीय साहित्य विक्री दुकान, चार्टर्ड अकाऊंट्सचे कार्यालय, दवाखाना, इलेक्ट्रिकल दुकान या सहा दुकानांचा समावेश आहे. कणकवली बाजारपेठ येथे उभ्या असलेल्या एका दुचाकीचे काही पार्टही त्यांनी चोरले.

पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक निरीक्षक सागर खंडागळे, उपनिरीक्षक सूरज चव्हाण, सहाय्यक उपनिरीक्षक बापू खरात श, कॉन्स्टेबल किरण मेथे आदींच्या पथकाने पंचनामा केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!