गोव्यातही पेट्रोलनं ओलांडली शंभरी ; दोडामार्गवासीयांची पुन्हा घालमेल !

वाहनचालक, सर्वसामान्यांनाही बसणार फटका

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : गोवा राज्याच्या सीमेवर वसलेल्या दोडामार्ग तालुक्यातील नागरिकांना आता गोव्यातील पेट्रोल दरही शंभरी पार झाल्याने नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. रोजगारासह आरोग्य व पेट्रोल डिझेलसंह अनेक बाबीसाठी आजही दोडामार्ग गोवा राज्यावर अवलंबून आहे. मात्र आता दुचाकी व चारचाकी वाहन चालकांसाठी अत्यंत गरजेची गोष्ट असलेल्या पेट्रोल डिझेलचे भाव महाराष्ट्र राज्यात या अगोदरच गगनाला भिडलेले आहेत.

मध्यंतरी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी तर वचननाम्याप्रमाणे पेट्रोलच्या किंमतीत वॅटची आकारणी कमी करून पेट्रोलचे भाव तब्बल महाराष्ट्रापेक्षा ११ रुपयांनी कमी केले होते. त्यामुळे गोवेकरांसह दोडामार्ग तालुका वासीयांनाही ११ रुपये स्वस्त पेट्रोल मिळत होते. मात्र विद्यमान गोवा मुख्यमंत्री यांनी यात बदल करून व्हॅट व जीएसटी आकारणी वाढवल्याने पेट्रोलचे भाव थोडे वाढले होते.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती आकाशाला भिडल्या गेल्या. आतापर्यंत गोव्यात त्यामानाने स्वस्त मिळत असलेलं पेट्रोलही आता १०० रु. लिटर झाल्याने गोव्यासह दोडामार्ग तालुक्यातील वाहन चालकही हवालदिल झाले आहेत. सर्वसामान्यांना तर त्याचा मोठा फटका बसत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!