गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील

राज कुंद्राच्या Whatsapp चॅटमधून खळबळजनक खुलासा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबईः राज कुंद्रा प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा गोव्यात बेस उभारण्यासाठी विचार करत होता आणि त्याला दक्षिण गोव्यात एकांत रिसॉर्ट खरेदी करायचा किंवा भाड्याने घ्यायचा होता, जिथे सर्व पॉर्न शूट आणि लाइव्ह स्ट्रीमिंग त्याला करता येऊ शकले असते.

हेही वाचाः कोरोना व्हॅक्सिनच्या मॉडेलनुसार प्लेगची व्हॅक्सिन तयार; 40 लोकांवर होणार ट्रायल

राज कुंद्राचं वॉट्सअप चॅट समोर

वॉट्सअप ग्रुप चॅट मेसेजीसपैकी एका मेसेजमध्ये कुंद्राने प्रमोट केलेले पॉर्न एप ‘हॉटशॉट्स’ टीमच्या एका सदस्याने, गोव्यातील पोलीस आणि अधिकारी मॅनेज होऊ शकतील, असं म्हटलं होतं, तर दुसऱ्या एका सदस्याने मुंबईहून गोव्यात ऑपरेशन हलवण्यावर प्रश्न उपस्थित केले होते.

गोव्यातील पोलीस आणि अधिकारी सहज मॅनेज होऊ शकतील

ज्या वॉट्सअप चॅट ग्रुपमध्ये कुंद्रा एडमिन होता, त्यातील एका सदस्याला हे जाणून घ्यायचं होतं की, लोकल प्रवास, अन्न तसंच 24 तास असलेला वीजपुरवठा या बाबतीत मुंबई गोव्यापेक्षा स्वस्त असताना गोव्यात ऑपरेशन्स का हलवायची. ग्रुपमधील अजून एक सदस्य (जो गोव्याशी परिचित असल्याचं दिसत होतं) त्याचं असं म्हणणं होतं की गोव्यातील पोलीस आणि अधिकारी सहज मॅनेज होऊ शकतील, जे कुंद्राने मान्य केलं.

हेही वाचाः सासष्टीतही कागदपत्रांत बेकायदा फेरफार करून जमिनी हडप

व्यवसाय गोव्यात हलवण्याची चालली होती तयारी

गोवा मुंबईपासून फार दूर नसल्यामुळे आणि एअर-कनेक्टिव्हिटी खूप चांगली असल्यानं बेस गोव्यात हलवणं, रिसॉर्ट भाड्याने घेणं आणि तिथून काम सुरू करण्याची योजना होती. एका पोलिसी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा दक्षिण गोव्यात खाजगी समुद्रकिनारा क्षेत्र, छोटं जंगल आणि मोठे लॉन्स असलेल्या 10 खोल्यांच्या रिसॉर्टच्या मालकाशी संपूर्ण मालमत्ता खरेदी करण्यासाठी, किंवा दीर्घ काळासाठी भाडेपट्टीवर घेण्यासाठी वाटाघाटी करत होता, जिथे त्याला पॉर्न शूट्स करायचे होतं.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

कुंद्राला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून न्यायालयाने बुधवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती असलेला उद्योगपती राज कुंद्रा याने अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल एपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 19 जुलै रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचाः गोवा दिवाळखोरीच्या दिशेने चाललायः सुदीन ढवळीकर

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!