फोंडा तालुक्यात उमेदवारांचा वैयक्तिक गाठीभेटींवर भर…

उमेदवारांकडून स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : तालुक्यातील १९ पंचायतींमध्ये दि. १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सोमवारी सायं. ५ वा. प्रचाराची सांगता होणार असून प्रत्येक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यग्र आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने प्रत्येक प्रभागात प्रचाराला वेग आला आहे. 
हेही वाचा:निवडणूक प्रचारात आमदारांचाही सहभाग…

मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करत आहेत उमेदवार      

बुधवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून उमेदवारांनी रविवारी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर अधिक भर दिला. रविवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उमेदवार प्रचारात व्यग्र असल्याचे दिसून आले. काही प्रभागांत मंत्री, आमदारही आपल्या समर्थक उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले दिसून आले. प्रचार सुरू असताना काही ठिकाणी मतदार व उमेदवार यांच्यात बाचाबाची झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मडकई मतदारसंघातील एकाच प्रभागातील एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविणारे उमेदवार स्थानिक आमदारांचा पाठिंबा असल्याचे मतदारांना सांगत आहेत. त्यामुळे मतदार संभ्रमात पडले आहेत. पंचायत निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन उमेदवार करत आहेत.
हेही वाचा:अपात्र लाभार्थ्यांकडून होणार किसान सन्मान निधीची वसुली…

उमेदवारांचे प्रचार केल्याने परिसरात बनला चर्चेचा विषय

धारबांदोडा तालुक्यातील सावर्डे मतदारसंघातील काही पंचायतींमध्ये स्थानिक आमदार व खासदार यांनी आपल्या समर्थक उमेदवारांचे प्रचार केल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही नेते भाजपचे आहेत; मात्र एकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या उमेदवारांचा ते प्रचार करत असल्याने मतदार संभ्रमात पडल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम निश्चितच निकालावर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 
हेही वाचा:नाक-तोंड दाबूनच समीराचा खून…    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!