land Grabbing | जमीन हडप प्रकरणी मामलेदारासह दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी…

हणजूण-बार्देशातील प्रकरणात मदत केल्याचा संशय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जमीन हडप प्रकरणांत याआधी दोन गुन्हे नोंद झालेल्या मामलेदार राहुल देसाई यांना विशेष चौकशी पथकाने गुरुवारी अटक केली. राहुल देसाई यांच्यासह यापूर्वी अटकेतून जामिनावर सुटका झालेल्या योगेश वझरकर व राजू मैथी यांनाही पुन्हा अटक करण्यात आली. दरम्यान तिन्ही संशयित आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचाःIndia Porn Ban : केंद्र सरकारकडून ‘या’ 67 पॉर्न बेवसाईट्सवर कारवाई…

‘एसआयटी’ने या चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला

बनावट दस्तावेज तयार करून अनेकांच्या मालमत्ता हडप करणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या ‘एसआयटी’ने हणजूण-बार्देश येथील जमीन हडप केल्याप्रकरणी ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्वीस आणि राॅयसन्स रॉड्रिग्ज या चौघांवर गुन्हा दाखल केला होता. मुंबईस्थित मूळ मालकाने तक्रार दाखल केल्यानंतर ‘एसआयटी’ने या चौघांवर गुन्हा दाखल केलेला होता. या चौघांनी हणजूण येथील सर्वे क्रमांक ४९३/२ मधील सुमारे ९५० चौरसमीटर जमिनीचे १,९५१ मधील बनावट विक्रीपत्र (सेल डीड) तयार केले. त्यानंतर संशयितांनी ६ ऑगस्ट २०२१ रोजी बनावट वारसदार प्रमाणपत्र (सक्सेशन डीड) तयार करून तत्कालीन बार्देश मामलेदार राहुल देसाई यांच्याकडून म्युटेशन करण्यात ते यशस्वी झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार ‘एसआयटी’ने या चारही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचाःSharad Pawar | शरद पवार गोवा दौऱ्यावर!

‘एसआयटी’ने गुरुवारी अटक केली

अधिक चौकशीनंतर रॉयसन्स रॉड्रिग्ज याने या प्रकरणात आम्हाला बार्देश मामलेदार राहुल देसाई यांनी मदत केल्याचे सांगितले होते. त्यामुळे सरकारने तत्काळ राहुल देसाई यांना पदावरून हटवलेही होते. याच प्रकरणाचा आधार घेत ‘एसआयटी’ने त्यांना गुरुवारी अटक केली.
हेही वाचाःPFI | पीएफआयच्या चार सदस्यांना वाळपई पोलिसांनी घेतले ताब्यात…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!