बार्देशमध्ये कळंगुट श्रीमंत, तर कामुर्ली पंचायत गरीब

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः बार्देश तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींपैकी उत्पन्नात कळंगुट पंचायत सर्वाधिक श्रीमंत, तर कामुर्ली पंचायत ही सर्वाधिक गरीब पंचायत आहे. कळंगुट पाठोपाठ कांदोळी आणि हणजूण कायसूव पंचायतांचा उत्पन्नात क्रमांक लागतो. तर नागरीकरणाच्या वाटेने चाललेल्या पर्वरीतील साल्वादोर द मुंद, सुकूर आणि पेन्हा दी फ्रान्स या पंचायतींचं उत्पन्नदेखील एक कोटीपेक्षा जास्त आहे.

हेही वाचाः हृदयद्रावक : दोन मुलींसह पित्यानं केली आत्महत्या

गटविकास कार्यालयाची माहिती

गटविकास कार्यालयाकडून उपलब्ध माहितीनुसार कळंगुट पंचायतीचे वार्षीक उत्पन्न 7 कोटी 99 लाख 67 हजार असं जवळपास आठ कोठी रूपये आहे. त्यानंतर कांदोळी पंचायतीचा क्रमांक लागतो. या पंचायतीचे उत्पन्न 5 कोटी 75 लाख 14 हजार रूपये असून 4 कोटी 68 लाख 23 हजार रूपये उत्पन्नाद्वारे हणजूण कायसूव पंचायतीचा क्रमांत तिसरा लागतो.

हेही वाचाः कोरोना प्रतिबंधक लस घ्या आणि सलुनमध्ये मिळवा 50 टक्के सूट !

पंचायती आणि त्यांचं उत्पन्न

त्यानंतर पिळर्ण मार्रा पंचायत 3 कोटी 55 लाख 18 हजार, पेन्हा दी फ्रान्स पंचायतीचं उत्पन्न 3 कोटी 52 लाख 78 हजार, सुकूर पंचायत 3 कोटी 4 लाख 42 हजार, हडफडे नागवा पंचायत 2 कोटी 37 लाख 15 हजार, हळदोणा पंचायत 2 कोटी 8 लाख 39 हजार, शिवोली मार्ना पंचायत 1 कोटी 84 लाख 96 हजार, रेईस मागूस पंचायत 1 कोटी 75 लाख 61 हजार, थिवी पंचायत 1 कोटी 61 लाख 89 हजार, साल्वादोर द मुंद पंचायत 1 कोटी 31 लाख 16 हजार, पर्रा पंचायत 1 कोटी 7 लाख, सडये शिवोली पंचायत 1 कोटी 1 लाख, नेरूल पंचायत 1 कोटी 66 हजार, वेर्ला काणका पंचायत 1 कोटी 21 हजार, या 16 पंचायतींचे उत्पन्न कोटीच्या घरात असून त्या करोडपती आहेत.
तर लखपतीमध्ये 17 पंचायतीमध्ये पहिला क्रमांक मयडे पंचायतीचा लागतो. या पंचायतीचं उत्पन्न 94 लाख 68 हजार आहे. त्यानंतर गिरी पंचायत 93 लाख 4 हजार, सांगोल्डा पंचायत 92 लाख 9 हजार, साळगांव पंचायत 90 लाख 88 हजार, आसगांव पंचायत 86 लाख 32 हजार, उसकई पालये पुनोळा 71 लाख 33 हजार, कोलवाळ पंचायत 67 लाख 60 हजार, अस्नोडा पंचायत 59 लाख 15 हजार, नास्नोळा पंचायत 54 लाख 91 हजार, पिर्ण पंचायत 52 लाख 19 हजार, पोंबुर्फा वळावली पंचायत 51 लाख 12 हजार, ओशेल शिवोली पंचायत 49 लाख 50 हजार, रेवोडा पंचायत 45 लाख 4 हजार, सिरसई पंचायत 41 लाख 5 हजार, बस्तोडा पंचायत 26 लाख 63 हजार, नादोडा पंचायत 20 लाख 91 हजार तर कामुर्ली पंचायत 14 लाख 35 हजार रूपये.

हेही वाचाः भरपूर ढिलाई आणि कर्फ्यूत वाढ! हीच तिसऱ्या लाटेसाठी अनुकूल स्थिती?

बस्तोडा, नादोडा आणि कामुर्ली या पंचायतींचा गरीब उत्पन्नात सर्वात खालचा क्रमांक लागत आहे. हळदोणा, हणजूण कायसूव, कळंगुट, कांदोळी, पेन्हा दी फ्रान्स, रेईस मागूस, सुकूर व थिवी या आठ पंचायतींचे अकरा प्रभाग, अस्नोडा, कोलवाळ, साल्वादोर द मुंद, गिरी, नेरूल, पिळर्ण मार्रा साळगांव, शिवोली मार्ना व वेर्ला काणका या नऊ पंचायतींचे प्रत्येकी नऊ प्रभाग, तर हडफडे नागवा, आसगाव, कामुर्ली, मयडे, नास्नोळा, बस्तोडा, ओशेल शिवोली, पर्रा, पोंबुर्फा वळावली, पिर्ण, रेवोडा, सांगोल्डा, सडये शिवोली, सिरसई, उसकई पालये पुनोळा या 15 पंचायतींचे प्रत्येकी सात प्रभाग तर एकमेव नादोडा पंचायतीचे पाच प्रभाग क्षेत्र आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!