लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, मात्र विरोधासाठी विरोधी बोलू नये

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांचं आवाहन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः राज्यातील ४० चाळीही मतदारसंघावर नजर मारली तर केवळ पेडणे मतदारसंघातून येणाऱ्या प्रकाल्पातून रोजगाराची हमी आहे. इतर मतदारसंघात तशी हमी नसल्याचा दावा करून ही लोकशाही आहे, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मात्र विषय धरून बोलायला हवं, तथ्य नसलेले व्हिडिओ- ऑडियो वायरल करून जनतेची दिशाभूल करू नये, असं आवाहनं उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी केलं.

हेही वाचाः अखिल गोवा उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा. दिलीप धारगळकर

तेव्हा उपमुख्यमंत्री कुठे होते?

कोरगाव येथे शिवराज्यभिषेक सोहळ्याला उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते समर्थकांशी संवाद साधत होते. रस्त्यावर उभ्या नागरिकांची विचारपूस करत होते. त्याच वेळी काही नागरिकांनी त्यांना पाण्याची समस्या, तौक्ते वादळामुळे झालेलं नुकसान असं सगळं सांगताना त्यावेळी उपमुख्यमंत्री कुठे होते, असा सवाल केला.

हेही वाचाः गोव्यातुन परतणाऱ्या ऑक्सिजन टँकरला तिलारी घाटात अपघात

केवळ विरोधासाठी विरोध करू नका

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी प्रश्नाल उत्तर देताना सांगितलं, विरोधक कमी असले किंवा जास्तच असले तरी मला फरक पडत नाही. मी जो विकास केला तो जनतेच्या लक्षात आहे, विरोधकांनी आपलं काम करावं, आम्ही आमची कामं करतो. विरोधकांमुळेच जोरात विकास चालू आहे, काही विरोधक मुद्दाम मी विकास केला नाही म्हणून ओरड मारतात. काहीजण तथ्य नसलेल्या विषयाचे ऑडिओ-व्हिडीओ वायरल करतात.  त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये, सकारात्मक विचार करावा, असं सांगितलं.

हेही वाचाः शिकाऱ्यांचीच केली शिकार ! दोडामार्गच्या सिंघम लेडी नदाफ यांची चमकदार कामगिरी

पेडणेचे प्रकल्प

पेडणे तालुक्याच्या विकासाठी अनेक प्रकल्प मी आणलेत. येथली बेरोजगारी हटवण्यासाठी मोपा विमानतळ, आयुष्य हॉस्पिटल आणि आंतराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेट स्टेडियम येत आहे. या प्रकल्पातून रोजगार उपलब्ध होणार आहे आणि ते रोजगार मतदारसंघातील बेरोजगार युवकांना मिळणार असल्याचा दावा यावेळी आजगावकरांनी केला. विरोधकांनी मी आमदार होण्यापूर्वीचा पेडणे कसा होता आणि आताचा पेडणेमतदारसंघ कसा आहे हे पहावं. मी आमदार, मंत्री झाल्यानंतर विकासाची कवाडं उघडलीत, असं आजगावकर म्हणाले. केवळ मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी पक्षांतर केलं, आता यापुढे कधीच पक्षांतर करणार नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!