जादा भाडे आकारल्यास रुग्णवाहिकेवर कारवाई

सरकारने दर केले निश्चित; ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाना, नोंदणी होणार रद्द

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोरोना विषाणूच्या साथीनं सध्या देशात हाहाकार माजवला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अशात कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही दररोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. यामध्ये निष्पाप लोकांचे हकनाक जीव जात आहेत. अशा संकटकाळात काहीजण मात्र पैसा कमविण्याचा प्रयत्न करत आहे. खासगी रुग्णवाहिका चालकानी तर अक्षरशः लूट चालवली आहे. निकडीच्या प्रसंगी घरापासून रुग्णालयात जाण्यासाठी किंवा रुग्णालयातून स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी जादा पैसे उकळत आहेत. त्यामुळे कोरोना काळात मरणही परवडत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा रुग्णवाहिका चालकांना चाप देत सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय.

हेही वाचाः मुख्यमंत्री म्हणाले, मदतीसाठी धन्यवाद; कोलगेट पामोलिव्हचे मानले आभार

जादा पैसे आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालकांना चाप

कोरोना काळात वैद्यकीय सुविधा देणाऱ्या विविध व्यावसायिकांचा काळाबाजार यापूर्वीच चव्हाट्यावर आला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनपासून अगदी ऑक्सिजन बेड मिळवून देण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. अशात रुग्णवाहिका चालकानं मृताच्या नातेवाईकांना वेठीस धरून पैसे उकळण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. हा बाजार रोखण्यासाठी सरकारने रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केलेत. ज्यामुळे आता रुग्णवाहिका चालकांना जास्तीचे पैसे उकळता येणार नाहीत.

सरकारने निश्चित केलेले दर

खासगी रुग्णवाहिका चालकांनी चालवलेली लूट थांबवण्यासाठी सरकारने साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या कलम 2(1) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करत पेशंट ट्रान्सपोर्ट अॅम्ब्युलन्स (पीटीए); बेसिक लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स (बीएलएस) आणि अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स (एएलएस) आणि हेअरसे व्हॅन्ससाठी भाड्याची मर्यादा निश्चित केली आहे. ज्यामध्ये पेशंट ट्रान्सपोर्ट अॅम्ब्युलन्स (पीटीए)साठी 10 कि.मी. अंतरासाठी 1500/- आणि 10 कि.मी.च्या पुढे प्रत्येक कि.लो. 50/- रु. लागू तसंच प्रति कि.मी. 25/- रु. परतीचे शुल्क; बेसिक लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स (बीएलएस)साठी 10 कि.मी. अंतरासाठी 2000/- आणि 10 कि.मी.च्या पुढे प्रत्येक कि.लो. 50/- रु. लागू तसंच प्रति कि.मी. 25/- रु. परतीचे शुल्क; अॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट अॅम्ब्युलन्स (एएलएस) साठी 10 कि.मी. अंतरासाठी 4000/- आणि 10 कि.मी.च्या पुढे प्रत्येक कि.लो. 50/- रु. लागू तसंच प्रति कि.मी. 25/- रु. परतीचे शुल्क; हेअरसे व्हॅन्ससाठी 1500/- अधिक 25/- रु. प्रति. कि.मी. आणि 12.50 प्रति कि.मी. परतीचे शुल्क असे लागू करण्यात आले आहे.

हेही वाचाः Weight loss: वर्क फ्रॉम होम करून वजन वाढलंय? काळजीचं कारण नाही, हे करा…

नियम मोडल्यास परवाना रद्द

सरकारने घालून दिलेले नियम मोडल्यास किंवा ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जादा पैसे उकळताना दिसल्यास त्या रुग्णवाहिका चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा रुग्णवाहिका चालकाचा परवाना तसंच त्याची नोंदणी थेट रद्द करण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!