गुंड अनवर शेख हत्याप्रकरणी इमरान चौधरीला अटक

कर्नाटकच्या हवेरी पोलिसांची कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कुख्यात गुंड अनवर शेख हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या हत्येप्रकरणी कर्नाटकातील हवेरी पोलिसांनी इमरान चौधली याला अटक केली आहे. या हत्याप्रकरणाचा ठपका ठेवत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे. सोमवारी इमरान चौधरी याला पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. इमरानला ताब्यात घेण्यात आल्यामुळे आता इतरही हल्लोखोरांना लवकर शोध लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

4 जणांचा मिळून हल्ला

अनवर शेखवर रविवारी चार जणांनी मिळून हल्ला केला होता. या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झालाय. दरम्यान, या दोघांनी धारदार शस्त्रानं अनवर शेखवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अनवर शेखनं रक्ताच्या थारोळ्यात जीव सोडला. भररस्त्यात करण्यात आलेल्या या हत्येनं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पोलिसांचा धाक या भागात आहे की नाही, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

कोण आहे अन्वर शेख?

बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याच्या धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी, दरोडा, घरफोडी, चोरी, लैंगिक शोषण, खंडणी वसुली, बेकायदा जमाव करणे, प्राणघातक हल्ला करणे अशा सुमारे २६ गुन्हे अनवर शेखवर दाखल होते. मडगाव येथील कुख्यात गुंड अन्वर उफ टायगर शेख याचा हावेरी सवनुरु इथं त्यांच्यावर रविवारी हल्ल्या करण्यात आला होता. कर्नाटकातील हावेरी तालुक्यातील सवनुरु हे गुंड अन्वरचे जन्मठिकाण असून काही दिवसांपासून तो त्याठिकाणीच वास्तव्यास होता. रविवारी सकाळी काही तरुणांनी गुंड अन्वर याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात आला होता.

हेही वाचा – SHOCKING VIDEO | हत्येचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद

दरम्यान याआधी अन्वर शेख अशाच एका जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता. आर्ले फातोर्डा याठिकाणी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी गुंड अन्वर शेख याच्यावर अंतर्गत वादातून हल्ला झाला होता. संशयित रिकी होर्णेकर व इतरांनी तलवार, चेन, लोखंडी दांडा, कोयता आणि बंदूक असा सशस्त्र हल्ला अनवरवर केला होता.दरम्यान, रविवारी झालेला हल्ला त्याहीपेक्षा भीषण होत, हे या व्हिडीओतून स्पष्ट झालंय. अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात कितीतरी वेळ अनवरचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. अंगावर वर काटा आणणारी ही सगळी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पाहा व्हिडीओ – सपासप कुऱ्हाडीनं वार करत अनवर शेख रक्तबंबाळ, हत्येचा धक्कादायक Video Viral

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!