मोठी बातमी! अंजुणे धरणाचं पाणी कोणत्याही क्षणी सोडलं जाणार

मुसळधार पावसानं धरणाच्या पाणी पातळीत वाढ

देविदास गावकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील केरी- अंजुणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणारी पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपासून केवळ काही इंच बाकी आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर ही धोक्याची पातळी गाठली जाण्याची शक्यता. ह्याच अनुषंगाने जलस्त्रोत खात्याने केरी, मोर्ले, पर्ये आणि कारापूर- सर्वण पंचायतीला सतर्कतेचा इशारा दिलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी या धरणांमधून पाणी सोडलं जाण्याची शक्यता आहे.

अंजुणे धरणाची पातळी वाढल्यानंतर धरणातून पाणी सोडले जाते. हे पाणी प्रामुख्याने कष्टी आणि वाळवंटी नदीत सोडले जाते. या नद्यांच्या ओहीटीवेळी हे पाणी सोडले जात असले तरी या नद्यांची अचानक पातळी वाढण्याचा धोका लक्षात घेता स्थानिक लोकांनी दक्षता घ्यावी, असंही खात्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. या नद्यांच्या किनारी राहणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी, असा इशाराही जलस्त्रोत खात्याने दिलाय.

हेही वाचा : जिथे भरपूर रहदारी असते, अशा पणजीच्या रस्त्यावर भलंमोठं आंब्याचं झाड कोसळलं!

अंजुणे धरण ८६.९१ मीटरपर्यंत भरलं

अंजुणे धरण हे सध्या ८६.९१ मीटरपर्यंत भरलं असून धरणार ८९.६० मीटरपर्यंत धरणात पाणी साठवले जाते. येत्या काही दिवसांत धरणातील अतिरिक्त पाणी कस्टी आणि वाळवंटी नदीत सोडलं जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही केल्या कमी झालेला नाही. येत्या आठवड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. अजूनतरी राज्यातील कोणत्याही भागाला पुराचा धोका नसला, तरीही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री सावंत यांच्या दिल्लीत भेटीत ‘ही’ चर्चा झाली?

दुसरीकडे गोव्यात पावसाचं शतक पूर्ण झालंय. आतापर्यंत ७५ इंचांपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आलाय. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ५.१९ इंच पाऊस रविवारी नोंदवण्यात आलाय. दरम्यान, पुढचे चारही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!