आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

काँग्रेस विधिमंडळ पक्षच नाही..!

काँग्रेस विधिमंडळ पक्षच अस्तित्त्वात नाही. फुटिर आमदार क्लाफास डायस-विल्फ्रेड डिसा यांचं सुप्रीम कोर्टाला उत्तर. अपात्रता याचिका दाखल करण्याचा गिरीश चोडणकरांना अधिकार नसल्याचा केला दावा.

गडेकरांचा भाजपशी संबंध नाही!

गोवा फॉरवर्डमध्ये पक्षप्रवेश केलेल्या प्रशांत गडेकरांचा भाजपशी संबंध नाही. उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांनी दिलं स्पष्टीकरण. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंवर आजगावकरांची जोरदार टीका.

पेट्रोलचे दर प्रतिलिटर शंभरीपार?

राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर भडकले. पेट्रोल प्रतिलिटर 87 रुपयांच्या पार, तर डिझेलच्या दरात दहा दिवसांत 3 रुपयांची वाढ. पेट्रोल शंभरी पार करण्याची शक्यता.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून धिरयो

धिरयोंच्या आयोजनावरील बंदीला बाणावलीत हरताळ. बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल. धिरयोंच्या आयोजकांवर कारवाई होणार का? प्राणीमित्रांचा सवाल.

कॅसिनोला गोवा फॉरवर्डचा विरोध नाही

कॅसिनोंना आमचा कधीच विरोध नव्हता, आताही नाही. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंचं धक्कादायक विधान. कॅसिनोंवर अनेकांची उपजीविका चालत असल्याची मखलाशी.

काँग्रेस-गोवा फॉरवर्डच्या युतीचे संकेत

येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत युती करण्यास उत्सुक, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाईंनी जाहीर केली भूमिका, राष्ट्रवादीसोबत युती करताना ठेवणार अटी.

पीएफचा व्याजदर घसरणार?

‘पीएफ’च्या व्याजदराबाबत 4 मार्चला निर्णय, व्याजदराचा टक्का घसरण्याची शक्यता, केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय शक्य.

अडवईत सिलिंग कोळल्यानं संताप

लाखो रुपये खर्चून बांधलेल्या अडवई ग्रामीण वैद्यकीय दवाखान्याच्या छताच सिलिंग कोसळलं, एका वर्षाच्या आतच दुर्दशा झाल्यानं संताप, डॉक्टर्स, स्टाफसह रुग्णांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह.

राफेल नादालनं गाशा गुंडाळला

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालचा सनसनाटी पराभव, 21वं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं स्वप्न स्टेफानोस त्सित्सिपासकडून उद्ध्वस्त, महिलांमध्ये अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टीचंही आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात.

पैशांच्या बाजारात खेळाडूंचा लिलाव

आयपीएलसाठी खेळाडूंच्या लिलावात ख्रिस मॉरिस ठरला महागडा खेळाडू, राजस्थान रॉयल्सकडून 16 कोटी 25 लाखांना खरेदी, सर्वोच्च बोलीत मॉरिसनं मोडला युवराजसिंगचा विक्रम.

सुयश प्रभूदेसाई आरसीबीच्या ताफ्यात

आपीएल स्पर्धेच्या लिलावात गोव्याचा सुयश प्रभूदेसाईचा करार, विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूच्या ताफ्यात सुयशचा समावेश, 20 लाखांच्या बेस प्राईसवर आरसीबीकडून खरेदी.

कसोटीपटूची चक्क टी-ट्वेंटीत खरेदी

भारताचा अव्वल कसोटीपटू चेतेश्वर पुजाराची आयपीएलमध्ये धूम, 50 लाखांच्या बेस प्राईसवर धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जनं केली खरेदी.

कृष्णप्पा गौतमला भरघोस बोली

कर्नाटकचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृष्णप्पा गौतमचं नशीब फळफळलं, चेन्नई सुपरकिंग्जकडून तब्बल 9 कोटी 25 लाखांना खरेदी.

प्रिती झिंटाच्या संघात शाहरूख खान

तामिळनाडूचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहरूख खान पंजाब किंग्सच्या ताफ्यात, देशांतर्गत क्रिकेटमधील चमकदार कामगिरीमुळे पंजाबकडून 5 कोटी 25 लाखांत खरेदी.

हरभजन सिंगला मिळेना खरेदीदार

आयपीएल लिलावात अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग अनसोल्ड, चेन्नईनं रिलिव्ह केल्यानंतर लागली नाही बोली.

अष्टपैलू शिवम दुबे राजस्थानकडे

युवा अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेची राजस्थान रॉयल्सकडून खरेदी, 4 कोटी 40 लाखांची अंतिम बोली.

मोईन अलीसाठी संघांमध्ये चुरस

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीसाठी आयपीएल संघ व्यवस्थापनांमध्ये दिसली चुरस, चेन्नई सुपरकिंग्सनं बाजी मारत सात कोटी रुपयांत केली खरेदी.

फ्लॉप शोनंतरही मॅक्सवेलला चांगली किंमत

गेल्या आयपीएल मोसमातील फ्लॉप कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला मोठी किंमत, आरसीबीकडून 14 कोटी 25 लाखांत खरेदी.

किंग्स इलेव्हन आता पंजाब किंग्स

प्रिती झिंटाच्या किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या नावात बदल, आता पंजाब किंग्स नावानं उतरणार आयपीएलच्या मैदानात, नव्या लोगोचं थाटात अनावरण.

वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन मालामाल

ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज पंजाब किंग्सच्या ताफ्यात दाखल, तब्बल 14 कोटी रुपयांची बोली.

गरज पडल्यास पीक जाळू, पण…

तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणार्‍या संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत आक्रमक, प्रसंगी पीकं जाळून टाकू, पण आंदोलन सोडणार नसल्याचा केंद्र सरकारला इशारा.

कोरोनाचे दोन नवे विषाणू आढळल्यानं सतर्कता

दक्षिण अफिका आणि ब्राझीलमध्ये कोरोनाचे दोन नवे विषाणू आढळल्यानं भारतात बाहेरील देशातून येणार्‍या प्रवाशांसाठी अटी लागू, ब्रिटन, युरोपीय देश आणि मध्य पूर्वेतील देशातून भारतात येणार्‍यांसाठी नियम जारी.

अमेरिकेत गारठा, सतर्कतेचा इशारा

अमेरिकेत प्रचंड थंडीची लाट, टेक्सासमध्ये हुडहुडी, वीजही गायब, टेक्सास, आर्कनसास, मिसीसीप्पी आदी ठिकाणी प्रचंड बर्फवर्षाव होणार असल्याचा अमेरिकी हवामान खात्याचा इशारा.

पंतप्रधान मोदी करणार ‘परीक्षा पे चर्चा’

आगामी शालेय परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार परीक्षा पे चर्चा, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधणार संवाद. सहभागासाठी होणार ऑनलाईन स्पर्धेतून निवड.

महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात संचारबंदी

महाराष्ट्रातील विदर्भात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ, संसर्ग रोखण्यासाठी वाशिम जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश, अन्य भागांतही संचारबंदीचा विचार.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!