दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

परीक्षांबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे सीबीएसईच्या दहवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बोर्ड्चाय परीक्षांचं काय होणार, असा प्रश्न वाढत्या कोविड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पालकांना पडलाय. दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ठरलेल्या वेळेनुसार या परीक्षा पार पडतील, अशी माहिती मिळतेय. त्याप्रमाणे शिक्षण मंडळानंही परीक्षा घेण्याची तयारी केली असल्याचं कळतंय.

ठरल्याप्रमाणेच!

राज्यात बारावीच्या परीक्षा 24 एप्रिल म्हणजे पुढच्या दहा दिवसांनी सुरु होणार आहेत. तर 17 मे पर्यंत बारावीच्या परीक्षा चालणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा 13 मे पासून सुरु होणार असून त्या 4 जून पर्यंत चालणार आहेत. एकूणच राज्यासह देशातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता नियमांचं पालन करत परीक्षांचं आयोजन करण्याचं आव्हान शिक्षण खात्यासमोर आले. बारावीच्या परीक्षेला 19 हजार 247 तर दहावीला 24 हजार 300 विद्यार्थी बसणार आहेत.

केंद्र हललं, गोवा ठाम!

देशासोबतच राज्यातही कोरोनाचं संकट आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतेय. अशातच शेजारी महाराष्ट्रात लॉकडाऊन सारखेच कडक निर्बंध घातलेत. महाराष्ट्रातही बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रका वाढत्या कोरोनामुळे हललंय. एकीकडे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार वाढत्या कोरोनामुळे हललं असलं तरी बोर्डाच्या परीक्षा घेण्यावर गोवा सरकार ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. गोवा बोर्डाच्या परीक्षा मात्र कोविडसंबंधीची सगळी काळजी घेऊन नियोजनाप्रमाणेच होणार असं बोर्डानं म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!