आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

बातम्यांचा वेगवान आढावा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

‘मोपा’ला आणखी जमीन नाही!

मोपा लिंक रोडसाठी जमीन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, पोलिसांकडून अटकसत्र, शंभरहून अधिक ग्रामस्थांना अटक, आंदोलन सुरूच ठेवण्याचा लोकांचा निर्धार.

राज्यात शिवजयंती अपूर्व उत्साहात

राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी, फर्मागुढीवर झाला शासकीय कार्यक्रम, अनेक ठिकाणी बाईक रॅली.

सरकारनं राजशिष्टाचार मोडला : ढवळीकर

फर्मागुढीत शिवजयंतीच्या कार्यक्रमाचा शिष्टाचार सरकारनं मोडला, सुदिन ढवळीकरांची टीका.

सत्तरीत जमीन संघर्षलढ्याची शपथ

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सत्तरीतील भूमिपुत्र एकवटले, जमीन मालकीसाठी संघर्ष कायम ठेवण्याची घेतली शपथ.

अवकाळी पाऊस, बागायतदार चिंतित

राज्यात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी, पेडणे, पर्वरी, पणजी, फोंडा, सावर्डे, कुडचडेत पाउस, केपेत गारपीट, बागायतदार चिंतित.

खाण अवलंबितांचा निर्वाणीचा इशारा

खाण अवलंबितांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, खाणी सुरू करण्याबाबत 15 मार्चपर्यंत निर्णय न झाल्यास पणजीत आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ठेवणार ट्रक आणि मशिनरी.

भाजपला फोंड्यात मोठा धक्का

फोंड्यात भाजपला मोठा झटका, भाजप मंडळाच्या सचिव तथा फोंड्याच्या नगरसेविका चंद्रकला नाईक यांची भाजपला सोडचिठ्ठी, प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा.

मेजर पोर्ट कायदा अखेर अधिसूचित

मेजर पोर्ट कायदा अधिसूचित, एमपीटीला मिळणार जादा स्वायत्तता, पोर्टचे प्रशासन, नियंत्रण, व्यवस्थापन आता पोर्ट मंडळाकडे.

फक्त तीन ठिकाणी शिगमोत्सव

राज्यात यंदा फक्त तीन ठिकाणी शिमगोत्सव, 3 एप्रिलला पणजीत, तर 4 एप्रिल म्हापशात शिगमोत्सव, फोंड्याची तारीख दोन दिवसात होणार जाहीर.

‘भवाल’ नाटकाला प्रथम क्रमांक

कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचा निकाल, विमलानंद कलामंच-मडकईच्या भवाल नाटकाला प्रथम पारितोषिक, अपरांतमाची-पणजीच्या लग्न फेरेला द्वितीय, तर रसरंग-उगवेच्या अंधा युगला तृतीय बक्षीस.

आरोग्य खात्यात 2 हजार पदांसाठी भरती

आरोग्य खात्यात 2 हजार पदांच्या नोकरभरतीला मान्यता, सोमवारी जाहिरात, वाळपई शिवजयंती कार्यक्रमात मंत्री विश्वजीत राणेंची माहिती.

‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांची शेतकर्‍यांवर टीका

शेतकरी आंदोलनावरून ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन संतप्त, केंद्र सरकारला विरोध करण्याची फॅशनच आल्याची टीका, श्रीधरन पुढील आठवड्यात करणार भाजपात प्रवेश.

सरकारी कर्मचार्‍यांना इलेक्ट्रिक वाहनं बंधनकारक?

मंत्रालयासह सरकारी कर्मचार्‍यांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर बंधनकारक करा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा सरकारला सल्ला.

कॅप्टन सतीश शर्मांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार, राहुल गांधी यांनी शर्मा यांच्या पार्थिवाला दिला खांदा.

शिक्षणासोबतच विचारसरणीही महत्त्वाची : मोदी

शिक्षणाबरोबरच आपली विचारसरणी कशी आहे, यावर बरंच काही अवलंबून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस जखमी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील बारजुल्ला भागात जवानांवर दहशतवाद्यांचा हल्ला, गोळीबारात दोन पोलीस कर्मचारी जखमी, रुग्णालयात उपचारांसाठी दाखल.

इंधन महागल्याबद्दल चक्क मोदींचे आभार

मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी वाढत्या इंधनदरांबद्दल केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन, पंतप्रधानांनी सौरऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक ऊर्जेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिल्याचा सारंग यांचा हास्यास्पद दावा.

वो जुमलों का शोर मचाते हैं..!

दररोज वाढणार्‍या इंधनाच्या किमतींवरून काँग्रेस नेते राहुल गांधींचा शायराना अंदाजात निशाणा, वो जुमलों का शोर मचाते हैं, हम सच का आईना दिखाते हैं! असं म्हणत केंद्र सरकारला केलं लक्ष्य.

चार सैनिक गमावल्याची चीनची कबुली

पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षात चीननं गमावले चार सैनिक, मृत सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं खोटारडेपणाचा भांडाफोड.

नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर लँडिंग

मंगळावरील जीवसृष्टीचं अस्तित्व शोधण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’नं सोडलं यान, पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावरील दुर्गम भागात यशस्वी लँडिंग

अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या संघात

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरसाठी उघडलं आयपीएलचं दार, मुंबई इंडियन्सनं घेतलं 20 लाखांना विकत, शिकायला मिळणार असल्याची अर्जुनची भावना.

बहुचर्चित ‘झुंड’चा पोस्टर जारी

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाचा पोस्टर जारी, 18 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला, अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत.

अन्यायाविरुद्ध लढणं महत्त्वाचं : रिंकू

जात महत्त्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्त्वाचं, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा संदेश, इन्स्टाग्रामवरून दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा.

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक सुरूच

महाराष्ट्रात 24 तासांत नव्या 6 हजार 112 कोरोनाबाधितांची नोंद, 44 रुग्णांचा मृत्यू, एकूण करोनाबाधितांची संख्या 20 लाखापार.

अमिताभ, अक्षयला संरक्षण देणार : आठवले

अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपट शुटिंगला संरक्षण देणार, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेचं वक्तव्य, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या टीकेनंतर जाहीर केली भूमिका.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!