तातडीनं वाघेरी कॅम्पमध्ये हजर व्हा! राज्यातील सर्व PSIना आदेश

सर्व पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील सर्व पोलिसांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी सर्व पोलिस स्थानकातील पोलिसांनी वाळपईतील आयआरबीच्या वाघेरी कॅम्पमध्ये हजर राहण्याचे आदेश दिले आहे. तातडीनं वाघेरी कॅम्पवर सर्व पीएसआय यांनी हजर राहावं असे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, आज सकाळपासून राज्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी आधीपासून वाळपईत दाखल झाले आहेत. काल वाळपई पोलिस स्थानकात मेळावली वासियांनी धडक मोर्चा काढला होता. पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिल्याच्या आरोपासून सर्व आंदोलक खवळे होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिस महासंचालकांनी वाळवईमध्ये तातडीची बैठक घेतली आहे. तर दुसरीकडे आंदोलकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्रीच समाज कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची म्हापशात रवानगीही करण्यात आली आहे.

हेही वाचा – मेळावलीतील हल्ला पूर्वनियोतच! पोलिसांचा दावा

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनीही कायदा हातात घेणाऱ्यांना समज दिली आहे. आयआयटी होणारच, असा पवित्रा सरकारानं घेतलाय. कुणीही कायदा हातात घेतला, तर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. तसंच पोलिसांनाही कायदा हातात घेणाऱ्यांना अद्दल घडवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुधवारी पोलिस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. मंगळवारीही पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष आता वाळपईतील पोलिस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे लागलंय.

Video | बघाच! मेळावलीत पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!