कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश? आज सुनावणी

मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात सुनावणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड प्रतिबंधक लचीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश द्यावा, असा अर्ज राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केला आहे. या अर्जावर आज खंडपीठात सुनावणी होणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस जर घेतले असले, तर त्यांना आरटी पीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, कोर्टात होणाऱ्या सुनावणीमध्ये काय ठरतं, हे पाहणंही महत्त्वाचंय.

corona-eps
corona-eps

खंडपीठाने काय म्हटलं होतं?

या प्रकरणी आरोग्य खात्याचे अवर सचिव गौतमी परमेकर यांनी खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात खंडपीठाने ६ मे रोजी दिलेल्या आदेशात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. खंडपीठाने ६ मे रोजी निर्देश जारी करून राज्यात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्टचं निगेटिव्ह सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आलं होतं. त्यानंतर जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या वाहनांतील कामगारांना कोविड नकारात्मक प्रमाणपत्र अनिवार्य नसल्याचा निर्देश खंडपीठाने दिला आहे.

हेही वाचा : माझी पत्नी आगामी निवडणुक लढवण्यास इच्छुकः मायकल लोबो

सरकार काय म्हणतंय?

त्यात दुरुस्ती करून करोनाचे दोन्ही लस घेतलेल्यांना राज्यात प्रवेश देण्याची मागणी केली आहे.

या व्यतिरिक्त तज्ज्ञ समितीच्या २ जुलै रोजी झालेल्या बैठकीत कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अर्जात देण्यात आली आहे. तसेच ओदिशा, छत्तीसगढ, नागालँड, राजस्थान राज्याने दोन्ही लस घेतलेल्यांना प्रवेश दिल्याची माहिती अर्जात नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त पंजाब आणि चंडीगडने एक लस घेतलेल्यांना प्रवेश दिल्याचंही माहिती अर्जात नमूद करण्यात आलंय.

अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त , पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!