मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा सविस्तर…

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : विधानसभेचे पावसाळी पावसाळी अधिवेशन ११ जुलैपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी नंतर जाहीर केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर विधानसभा संकुलात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचाःमहागाईचा कहर! सामन्यांच्या खिशाला पुन्हा कात्री…
वीज विभागातील एपीडीपीआरच्या आयटी सेवेलाही मुदतवाढ
विधानसभेच्या संकुलात बुधवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची सविस्तर माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कौशल्य आणि उद्योजकता विभागासाठी ५२ पदांना मान्यता देण्यात आली आहे. गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर खरेदीसाठी १ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाले आहेत. या खर्चाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. गेल्या वर्षी ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर ‘राष्ट्रीय संसदे’चा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाच्या खर्चाला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय योजनेंतर्गत वीज विभागातील एपीडीपीआरच्या आयटी सेवेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. आग्वाद किल्ला आणि कारागृहाच्या देखभालीचे कंत्राट ‘दृष्टी’ला दिले आहे. या कंत्राटाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचाःदिव्यांगजन स्वावलंबन योजनेचा लाभ घ्या…
खाण पाणी व्यवस्थापन साबांखाकडे
पावसाळ्यात खाणीला पूर येत असल्याने परिसरात पुराचा धोका संभवतो. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग पावसाळ्यात खाणीतून पाणी बाहेर काढण्यासाठी उपाययोजना आखतील. सरकारने खाण कंपनीला भाडेतत्त्वावरील मशिनरी जूनपर्यंत हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे खाण कंपन्यांनी पंप व इतर मशिनरी हलवण्यास सुरुवात केली आहे. इतकी वर्षे पावसाळ्यात खाणीतून पाणी उपसण्याची जबाबदारी खाण कंपन्यांची होती. आता खाण कंपन्यांनी मशिनरी हटवल्यास खाणीत पाणी भरण्याची भीती आहे. भाडेतत्त्वावरील पंप काढू नयेत, असे खाण कंपन्यांना सांगण्यात आले आहे. तरीही पंप काढल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाणीपुरवठा विभाग खाणीतील गाळ काढण्याची व्यवस्था करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचाःतीन दिवसांत एकूण ४८ अधिकाऱ्यांच्या बदल्या…