IMPACT | गोवन वार्ता लाईव्हच्या वृत्ताची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल…

पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था करण्याचे दिले निर्देश

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरी : पैकुळ गावासाठी नव्या मतदान केंद्राला मान्यता मिळालीए. राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक मामलेदारांना निर्देश दिलेत. गावात मतदान केंद्र देण्याबाबत पैकूळवासियांनी केली होती मागणी‌. या मागणीचं वृत्त गोवन वार्ता लाईव्हने बुधवारी प्रसारित केलं होतं. गोवन वार्ता लाईव्हच्या वृत्तानंतर राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक मामलेदारांना पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत.
हेही वाचा:गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघे जखमी…

गावचा इतर गावांशी संपर्क तुटला

गतवर्षीच्या पावसाळ्यात सत्तरीतील बहुतांश भागात पुरजन्य परिस्थित निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर रगाडा नदीला पुर आल्यानं पैकुळ गावातील पुल वाहून गेला. त्यामुळे पैकुळ गावचा इतर गावांशी संपर्क तुटला. त्यानंतर या ठिकाणी तात्पुरता पदपूल उभारण्यात आला. मात्र यंदाच्या पावसात त्या पूलाचे कठडे वाहून गेले. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल आता धोकादायक बनलाय.
हेही वाचा:हस्तकला महामंडळाचे ‘वरातीमागून घोडे’, वाचा सविस्तर…

निवडणूक आयोगाचे स्थानिक मामलेदारांना निर्देश

गेलं वर्षंभर नवा पूल उभारण्याचं काम सरकारने हाती घेतलंय. पण अद्याप या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे या गावातील लोकांना प्रवासात अडथळे येतात. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान येत्या १० ऑगस्टला पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मतदान केंद्राची व्यवस्था पैकुळ गावात करावी अशी मागणी स्थानिकांनी काही दिवसांपूर्वी केली होती. जर पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था होणार नसेल, तर गावातील लोक मतदान करणार नाहीत असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता. याविषयीचं सविस्तर वृत्त गोवन वार्ता लाईव्हने बुधवारी प्रसारित केलं होतं. गोवन वार्ता लाईव्हच्या वृत्तानंतर राज्य निवडणूक आयोगाचे स्थानिक मामलेदारांना पैकुळ गावात मतदान केंद्राची व्यवस्था करण्याचे निर्देश दिलेत.
हेही वाचा:250 चे तिकीट 500 ते 800 रूपये; लॉटरी तिकिटांंची ब्लॅकमध्ये विक्री…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!