देर आए दुरुस्त आए! गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्गच्या गाड्यांना अखेर मुभा

सिंधुदुर्ग भाजपाची यशस्वी शिष्टाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सुरु झालेल्या सीमाप्रश्नाचा फटका गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमाभागातील लोकांना मोठ्या प्रमाणात बसला. अनेक महिन्यानंतर अखेर या प्रश्नावर तोडगा निघालाय. गेल्या दोन दिवसांत सीमाभागातील लोकांच्या नेहमीच्या ये-जा करण्याच्या प्रश्नावरुन मोठी टीका केली जात होती. गोव्यात येण्यासाठी किंवा महाराष्ट्रातही प्रवेश करण्यासाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे. या नियमाचा फटका हातावार पोट असणाऱ्यांना बसत होता. अखेर या नियमात शिथिलता देण्यात आली असल्यानं सिंधुदुर्गातून गोव्यात दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना दिलासा मिळालाय.

काय ठरलं?

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांना नवे आदेश दिले आहेत. त्यानुसार गोव्यात जाण्यासाठी सिंधुदुर्गातील गाड्यांना मुभा दिली जाणार आहे. गोवा राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगारानिमित्त जाणाऱ्या युवकांचा प्रश्न गंभीर आहे. .त्यामुळे गोवा राज्यात दोडामार्ग, पत्रादेवी चेक नाक्यावरून जाताना युवक युवतींना आर.टी.पी.सी.आर टेस्ट किंवा कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे या युवकांना या सक्तीतून मुक्तता मिळावी यासाठी महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग भाजपा शिष्टमंडळाने गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

त्यानुसार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी व पोलिस महानिरिक्षकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांना तपासणीत शिथिलता द्या असे आदेश दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपची शिष्टाई अखेर यशस्वी ठरली. यावेळी जावेद खतीब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, जिल्हा बॅक संचालक गुरुनाथ पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, संदीप बांदेकर, सरचिटणीस मधुकर देसाई, सदस्य विनेश गवस, साई धारगळकर, शहर अध्यक्ष साई सावंत उपस्थित होते.

हेही वाचा : सावधान! महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसरी लाट?

मोठा दिलासा

शुक्रवारी आरोंदा केरी चेकपोस्टवरही तणाव पाहायला मिळाला होता. नोकरीनिमित्त किंवा कामासाठी गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना राज्यात प्रवेश दिला जात नव्हता. त्यांना कोविड चाचणी बंधनकारकच होती. अखेर याबाबत तोडगा निघाल्यानं दिलासा व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सीमाभागातून कामासाठी गोव्यात ये-जा करणाऱ्यांचा प्रश्न मिटलाय. त्यामुळे उशिरा का होईना, पण राज्यातील प्रवेशाचा मुद्दा अखेर सुटलाय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!