बदल्यांचं सत्र सुरुच! 43 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य पोलिस दलातील महत्त्वाची घडामोड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील पोलिस बदल्यांचं सत्र सुरुच आहे. पोलिस खात्यात चार वेगवेगळे आदेश जारी करण्यात आले आहे. या आदेशाद्वारे मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची बदली केली आहे. यात पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक मिळून ४३ अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश पोलिस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार मुख्यालयाचे अधीक्षक निधीन वालसन यांनी मंगळवारी जारी केले आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक प्रवीण गावस यांची बदली फोंडा विशेष विभागात केली आहे. त्याच्या जागी पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक याची बदली केली आहे. पोलिस निरीक्षक विरेंद्र वेळुस्कर यांची शापोरा किनारी सुरक्षा पोलिस स्थानकात केली आहे. त्या ठिकाणी असलेले पोलिस निरीक्षक सचिन लोकरे याची बदली पेडणे वाहतूक विभागात केली आहे. पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर याची बदली कोलवा पोलिस स्थानकात तर त्याजागी असलेले पोलिस निरीक्षक मेल्सन कुलासो यांची मडगाव विशेष विभागात बदली केली आहे. या व्यतिरिक्त पोलिस खात्याने ३७ पोलिस उपनिरीक्षकाची बदली केली आहे. यात १० महिला उपनिरीक्षकांच्या समावेश आहे.

कुणाकुणाची बदली?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!